अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टर्कीला आर्थिक दृष्टया उद्धवस्त करण्याचा इशारा दिला आहे. सीरियामधून अमेरिकन फौजा माघार घेत आहेत. त्यापार्श्वभूमीवर टर्कीने कुर्दिश पथकांवर हल्ला केला तर टर्कीची अर्थव्यवस्था उद्धवस्त करु अशी धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. त्याचवेळी कुर्दांनाही टर्कीच्या वाटेला जाऊ नका असे सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुर्दांवर हल्ला केला तर टर्कीला आर्थिकदृष्टया उद्धवस्त करु असे त्यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे तसेच २० मैलाचा सेफ झोन बनवण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला आहे. हा सेफ झोन कोण बनवणार, त्याचा खर्च कोण उचलणार याची ट्रम्प यांनी सविस्तर माहिती दिलेली नाही. द गार्डीयनने हे वृत्त दिले आहे.

सीरियामध्ये इसिसची जी काही उरली-सुरली सत्ता आहे किंवा त्यांनी पुन्हा डोकेवर काढण्याचा प्रयत्न केला तर कुठल्याही दिशेने त्यांच्यावर आम्ही पुन्हा हल्ला करु शकतो असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. सीरियामधून इसिसला नष्ट करण्याचे अमेरिकेचे जे धोरण होते त्याचा रशिया, इराण आणि सीरियाला सर्वाधिक फायदा झाला आहे. आम्हाला सुद्धा फायदा झाला पण आता सैन्य पथकांना माघारी बोलवण्याची वेळ आली आहे असे ट्रम्प म्हणाले.