अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा महत्त्वाचा हस्तक मानला जाणारा छोटा शकील याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येते आहे. ‘हिंदुस्थान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांच्या हाती या छोटा शकीलच्या संभाषणाची एक सीडी त्यांच्या हाती आली आहे. यामध्ये छोटा शकील फोनवरून मुंबईतील त्याच्या नातेवाईकांशी संवाद साधतो आहे. मात्र यानंतर त्याच्या मृत्यूचीही बातमी येते आहे. अंडरवर्ल्डमधून समोर आलेल्या बातम्यांनुसार ६ जानेवारीला छोटा शकील इस्लामाबादमध्ये त्याच्या काही कामासाठी गेला होता. त्याचवेळी त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्याला रावळपिंडीतील रूग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. अशी एक माहिती समोर येते आहे.

तर दुसऱ्या एका माहितीनुसार छोटा शकीलला ISI ने ठार केले आहे. छोटा शकीलसोबत संबंध ठेवणे ISI ला जड जाऊ लागले होते त्यामुळे त्यांनी आपल्या वाटेतून त्याला दूर केले अशीही बातमी आता समोर येते आहे. दोन दिवस त्याचा मृतदेह शवागारात ठेवण्यात आला. त्यानंतर ‘सी १३०’ या ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टने त्याचा मृतदेह कराचीला आणण्यात आला असेही समजते आहे. छोटा शकील त्याची दुसरी बायको आयेशासोबत कराचीतीली डीएचए कॉलनीतील फ्लॅट क्रमांक डी ४८ मध्ये वास्तव्य करत होता. छोटा शकीलचा दफनविधी उरकण्यात आल्यानंतर त्याची दुसरी बायको आयेशा आणि कुटुंबातील इतर सदस्यांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले आहे अशीही माहिती समोर आली आहे.

selfie point shock death
भाईंदर: महापालिकेच्या सेल्फी पॉईंटमधील विजेचा धक्का, जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Nitin chauhan death reason
काम मिळत नसल्याने अभिनेत्याने उचललं टोकाचं पाऊल, पत्नी-मुलगी घरात नसताना गळफास घेऊन संपवलं आयुष्य
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
A young man attempted suicide from the employees building in the Police Commissionerate area
पोलिस आयुक्तालय परिसरातील कर्मचाऱ्यांच्या इमारतीवरून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
Fear Avoidant Personality Disorder Personality relationship Personality Loksatta Chaturang
स्वभाव, विभाव: भीती आणि न्यूनगंडाचा फास
Sharad Pawar Hinganghat, Sharad Pawar news,
मतदान झाल्याबरोबर सरकारी योजनांचा खरा चेहरा…. शरद पवारांनी सांगितले भविष्यात काय घडणार?
What Ajit Pawar Said About Nawab Malik?
Ajit Pawar : “नवाब मलिकांना ३५ वर्षे ओळखतो ते दाऊदची साथ…”; अजित पवार नेमकं काय म्हणाले?

आयएसआय किंवा पोलिसांनी छोटा शकीलचा मृत्यू झाला असल्याचे अद्याप जाहीर केलेले नाही. तसेच भारतातील सुरक्षा यंत्रणांनीही या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. तरीही छोटा शकीलचा मृत्यू झाला असल्याच्या दोन प्रकारच्या बातम्या सध्या व्हायरल होत आहेत. एवढेच नाही तर या घटनेमुळे डॉन दाऊद इब्राहिम डिप्रेशनमध्ये गेल्याचेही समजते आहे. काही दिवसांपूर्वीच दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील या दोघांमध्ये मतभेद झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. आता तर छोटा शकीलच्या मृत्यूचीच बातमी समोर आली आहे. त्यामुळे डी कंपनीत नेमके काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.