देशभरात चर्चेत असणाऱ्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटावरुन दोन गट पडलेले असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख म्हणजेच सरसंघचालक मोहन भागवत यांनी या चित्रपटावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मोहन भागवन यांनी ज्या लोकांना सत्य जाणून घ्यायची इच्छा आहे किंवा ज्यांना सत्याची भूक आहे त्यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट नक्की पहावा, असं म्हटलंय. १९९० मध्ये काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांवर झालेले हल्ला आणि त्यानंतर त्यांना काश्मीरमधून करावं लागलेलं पलायन या कथानकावर हा चित्रपट आधारित आहे.
नक्की पाहा >> Photos: ‘द कश्मीर फाइल्स’चे समर्थक-विरोधक रितेशवर संतापले; कोणी ‘नेत्याचा मुलगा’ म्हटलं तर कोणी ‘झुंड’वरुन सुनावलं
सध्या या चित्रपटाचे समर्थक आणि विरोधक असे दोन गट पडले आहेत. अशावेळी मोहन भागवत यांच्या या वक्तव्याला अधिक महत्व प्राप्त झालंय. मोहन भागवत यांनी चित्रपटाचे निर्देशक विवेक अग्निहोत्री आणि त्यांची पत्नी तसेच चित्रपटाची अभिनेत्री पल्लवी जोशी यांची भेट घेतलीय. या भेटीदरम्यान मोहन भागवत यांनी हे वक्तव्य केलं.
नक्की वाचा >> ‘२०२४ चा इलेक्शन स्टंट’, ‘मुस्लिमांनाही मारलं’, ‘BJP नेही आमच्यासाठी…’; The Kashmir Files बद्दल काश्मिरी पंडितांची मतं
चित्रपटासाठी मोहन भागवत यांनी विवेक अग्निहोत्रींना शुभेच्छा देताना, “सत्याच्या शोधात असणाऱ्या प्रत्येकाने हा चित्रपट पाहिलाच पाहिजे. या चित्रपटामधील संवाद उत्तम आहे. त्यामधून पूर्ण कलात्मकता दिसते. यासाठी बरंच संशोधन करण्यात आलंय. त्यामुळेच सत्य काय आहे याची जाण ज्यांना आहे त्यांनी हा चित्रपट आवश्यक पाहिला पाहिजे,” असं म्हटलंय. ११ मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. यामध्ये अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, दर्शन कुमार या अभिनेत्यांनी महत्वाची भूमिका साकारलीय.
नक्की वाचा >> The Kashmir Files वरुन संतापल्या मेहबूबा मुफ्ती; मोदी सरकारवर टीका करत म्हणाल्या, “ज्या पद्धतीने…”
भाजपाची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये करमुक्त झालेल्या ‘काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या वादावर मंगळवारी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिप्पणी केली. ‘सातत्याने व्यक्तिस्वातंत्र्याचा झेंडा घेऊन उभी असलेली टोळी या चित्रपटाची बदनामी करत आहे’, असा आरोप मोदींनी केला.
नक्की वाचा >> विश्लेषण : चित्रपट टॅक्स फ्री होतो म्हणजे काय होतं? तिकिटांचे दर कमी होतात का?; फायदा कोणाला होतो?
काश्मीर खोऱ्यमतून १९९० मध्ये काश्मिरी पंडितांच्या पलायनावर या चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे. काश्मिरी पंडितांच्या विस्थापनाचा मुद्दा भाजपाच्या अजेंड्यावरही राहिलेला आहे. या चित्रपटावर काँग्रेसने तसेच, काही सिनेमा परीक्षकांनी प्रतिकुल मते व्यक्त केली आहेत. या विरोधाचा संदर्भ देत, मोदींनी मंगळवारी भाजपाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत या चित्रपटाचे समर्थन केले.
नक्की वाचा >> The Kashmir Files च्या मुद्द्यावरुन नितेश राणेंना शिवसेनेच्या विनायक राऊतांचा पाठिंबा; म्हणाले, “हा चित्रपट…”
‘हा चित्रपट काश्मिरी पंडितांबाबत कित्येक वर्षे जाणीपूर्वक दडवून ठेवलेले सत्य मांडतो. मात्र, या चित्रपटाची बदनामी केली जात आहे. एखाद्याला हा चित्रपट आवडला नसेल तर त्याला प्रत्युत्तर देणारा वा प्रतिवाद करणारा चित्रपट निर्माण करावा’, असे मत मोदी यांनी भाजपाच्या खासदारांसमोर मांडले.
नक्की वाचा >> ‘द कश्मीर फाइल’ पाहण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना ‘या’ दोन अटींवर मिळणार ‘हाफ डे’; मुख्यमंत्र्यांची घोषणा
कुठलाही सिनेमा चांगला की, वाईट याची नीट समीक्षा केली पाहिजे पण, त्याऐवजी या चित्रपटाविषयी शंका-कुशंका घेतल्या जात असून हे कट-कारस्थान आहे. कुठल्याही विषयावर योग्य मार्गाने सत्याची मांडणी झाली पाहिजे. त्यामुळे चिंता फक्त या चित्रपटाबद्दल नाही. देशाच्या भल्यासाठी सत्य मांडले पाहिजे. संबधित विषयातील एक बाजू एखाद्याला महत्त्वाची वाटू शकते, दुसऱ्याला अन्य एखादी बाजू महत्त्वाची वाटेल. हा चित्रपटातून सत्य मांडले जात असेल तर त्याला विरोध कशासाठी केला जात आहे, असा सवाल मोदींनी केला.
नक्की वाचा >> The Kashmir Files संदर्भातील ‘त्या’ पोस्टमुळे स्वरा भास्करवर अनेकजण संतापले; म्हणाले, “तुझ्या सॉफ्ट पॉर्न सिरीजला…”
पाकिस्तानकडून काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांना आर्थिक व लष्करी मदत पुरवली गेली. दहशतवाद्यांनी अनेक काश्मिरी पंडितांची हत्या केली. या हत्यासत्रानंतर काश्मिरी पंडितांना खोऱ्यातून पलायन करावे लागले होते. विस्थापित झालेले काश्मिरी पंडित अजूनही खोऱ्यात परत येऊ शकलेले नाहीत. हे सत्य ज्यांना दडपून टाकायचे आहे, तेच या चित्रपटाला विरोध करत आहेत, असे मोदी म्हणाले.