काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. मोदी आडनाव खटल्यात राहुल गांधी यांना गुजरात न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. यानंतर काँग्रेसकडून जल्लोष साजरा केला जातो आहे. राहुल गांधी यांना त्यांची खासदारकी पुन्हा मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या निर्णयानंतर राहुल गांधी काय म्हणाले?

“आज किंवा उद्या, उद्या किंवा परवा कितीही वेळ लागला तरीही सत्य जिंकतंच. मला काय करायचं आहे त्याबाबत माझ्या डोक्यात सगळं चित्र स्पष्ट आहे. जनतेने मला जो पाठिंबा दिला आणि ज्यांनी आम्हाला साथ दिली त्यांचे मी आभार मानतो.” असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- “राहुल गांधींना आता त्यांची खासदारकी तातडीने..”, काय म्हणाले आहेत पीडीटी आचार्य?

मोदी आडनाव बदनामीच्या खटल्यात गुजरात उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द करत सर्वोच्च न्यायलायने राहुल गांधी यांना मोठा दिलासा दिला आहे. राहुल गांधींचा संसदेत परतण्याचा मार्ग या निर्णयामुळे मोकळा झाला आहे. हायकोर्टाने शिक्षा सुनावताना पूर्ण विचार केला नाही असं आता सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी केलेलं वक्तव्य योग्य नव्हतं, सार्वजनिक आयुष्यात बोलताना भान बाळगलं पाहिजे असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा परखड सवाल

सुनावणीदरम्यान जेठमलानी यांनी वायनाडच्या मतदारांचा उल्लेख केला. “कोणत्याही मतदारसंघातील मतदारांचा हा अधिकार आहे की त्यांना दोषी नसलेल्या एखाद्या व्यक्तीला निवडण्याची संधी मिळावी”, असं जेठमलानी यांनी म्हणताच न्यायमूर्ती नरसिंह यांनी गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयावरच प्रश्न उपस्थित केला. “या प्रकरणात सर्वाधिक शिक्षा सुनावण्याची गरज काय होती?” असं ते म्हणाले. दरम्यान, यावर अभिषेक मनु सिंघवी यांनी “राहुल गांधींचं निलंबन म्हणजे त्यांच्या मतदारसंघातल्या मतदारांच्या अधिकारांचं हनन आहे”, असा युक्तिवाद केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Truth will always be victorious come what may i have clarity in mind on what to do and i will continue doing it said rahul gandhi scj