अंदमान व निकोबार बेटांवर रंगाचांग येथे बसवण्यात आलेल्या सुनामी इशारा यंत्रणेच्या मदतीने भूकंपानंतरच्या सुनामीची सूचना अवघ्या तीन मिनिटांत मिळू शकेल, असे नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी या संस्थेचे मुख्य वैज्ञानिक विनित कुमार यांनी सांगितले. भूकंपाचा धक्का बसल्यानंतर तीन मिनिटांत सुनामी येणार की नाही याचा इशारा मिळेल, असे त्यांनी डॉलीगंज येथे झालेल्या एका बैठकीत सांगितले. भूकंप झाल्यानंतर सागरी लाटांवर त्यांचा काय परिणाम होतो याचा आढावा घेऊन लगेचच सुनामीबाबत पूर्वसूचना दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इनफॉर्मेशन सव्र्हिसेस या हैदराबाद या संस्थेशी सल्लामसलतीनंतर सुनामीच्या धोक्याचा इशारा विविध विभागांना पाठवला जाईल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in