जपानमध्ये सोमवारी ( १ जानेवारी ) ७.६ ‘रिश्टर स्केल’ तीव्रतेचा जोरदार धक्का बसला आहे. यानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता. अशातच जपानच्या किनारपट्टीवर १.२ मीटर उंचीच्या लाटेनं धडक दिली आहे. इशिकावा परिसरातील वाजिमा किनाऱ्यावर १.२ मीटर उंचीच्या लाटा उसळल्या आहेत.
जपानमध्ये आलेल्या भूकंपानंतर समुद्रात ५ मीटरपर्यंत उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर निगाटा, टोयामा, यामागाटा, फुकुई, ह्योगो किनारपट्टी परिसरात त्युनामीचा इशारा देण्यात आला होता. तसेच, जनतेनं किनारी भाग सोडून उंचीच्या ठिकाणी आश्रय घ्यावा, असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे.
यातच इशिकावा परिसरातील वाजिमा किनारपट्टीवर १.२ मीटर उंचीच्या लाटा उसळल्या आहेत. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
ही वाचा : भूकंप का होतात? भूकंपाच्या आधीच प्राणी व पक्षांना कशी लागते चाहूल?
हेही वाचा : भूकंप म्हणजे नेमके काय?
दरम्यान, भूकंपानंतर नागरिकांमध्ये एकच भीतीचं वातावरण निर्माण झालं. नागरिकांनी मिळेलं तिथं आश्रय घेतला. अनेक इमारतींचं नुकसान झालं असून, ५ नागरिक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. मध्य जपानमधील अनेक महामार्ग बंद करण्यात आलेले आहेत. तसेच, भूकंपानंतर वीजपुरवठा खंडित झाला असून, ३४ हजार नागरिकांना याचा फटका बसला आहे.