तुर्कीच्या निवडणुकीत इस्लामिक पाया असलेल्या सत्ताधारी पक्षाला बहुमत गमवावे लागले आहे, त्यामुळे अध्यक्ष रेसीप तायिप एर्दोगन यांच्या विस्तारवादी आकांक्षांना लगामही घातला गेला.
‘द जस्टिस अँड डेव्हलपमेंट पार्टी’ (एकेपी) या पक्षाने अटीतटीच्या निवडणुकीत जास्त मते मिळवली, पण ती २०११ च्या ५० टक्के मतांपेक्षा १० टक्क्यांनी कमी झाली आहेत. तुर्कीच्या प्रतिनिधित्व प्रणालीनुसार आता एकेपी पक्षाला २००२ मध्ये सत्तेवर आल्यानंतर प्रथमच आघाडी सरकार करावे लागणार आहे. तुर्कीच्या निवडणुकीचे हे निकाल सनसनाटी मानले जात असून, कुर्दीश समर्थक पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीने संसदेत खासदार पाठवण्यासाठी आवश्यक असलेली १० टक्के मते मिळवली आहेत. आतापर्यंत ९९.९ टक्के मतांची मोजणी झाली आहे.