तुर्कस्तानची राजधानी अंकारामध्ये रेल्वे स्थानकाबाहेर आज झालेल्या दोन शक्तीशाली बॉम्बस्फोटात २० जणांचा मृत्यू झाला आहे. शांतता रॅलीसाठी जमलेल्या नागरिकांना लक्ष्य करीत अंकारा  स्टेशनजवळ झालेल्या या साखळी बॉम्बस्फोटात १००हून अधिक नागरिक जखमी झाल्याचेही वृत्त आहे.
माहितीनुसार, अंकारातील प्रमुख रेल्वे स्थानकाबाहेर शांतता मोर्चासाठी नागरिक एकत्र जमले असताना स्फोट घडवून आणण्यात आला. कुर्दीश दहशतवाही आणि लष्कर यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचा निषेध करणे हा या मोर्चामागचा उद्देश होता. अनेक सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यासाठी जमले होते. दरम्यान, अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने, स्फोटाची जबाबदारी घेतलेली नाही.

Story img Loader