Turkey Fire Accident : उत्तर तुर्कस्तानमध्ये एका स्की रिसॉर्ट हॉटेलला मंगळवारी लागलेल्या आगीत किमान ६६ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत ५१ जण झकमी देखील झाले आहेत, तुर्कीचे अंतर्गत विभागाचे मंत्री अली येरलीकाया (Ali Yerlikaya) यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“आम्ही अत्यंत दुखात आहोत. या हॉटेलला लागलेल्या आगीत दुर्दैवाने आम्ही ६६ जीव गमावले आहेत”, अशी प्रतिक्रिया येरलिकाया यांनी बोलू प्रांतातील कार्तालकाया येथील आग लागलेल्या ग्रँड कार्टल हॉटेलची (Grand Kartal Hotel) पाहाणी केल्यानंतर दिली. तर आरोग्य मंत्री कमाल Memişoğlu यांनी जखमी असलेल्यांपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले.

पहाटे साडे तीनच्या सुमारास ११ मजली ग्रँड कार्टल हॉटेलच्या रेस्टॉरंट असलेल्या मजल्यावर ही भीषण आग लागली. मात्र आगीच्या कारणांचा शोध घेतला जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

इमारतीबाहेर उडी मारल्याने दोघांचा मृत्यू

हॉटेलला आग लागल्यानंतर इमारतीतून जीव वाचवण्यासाठी बाहेर उडी घेतल्याने दोघांचा मृत्यू झाल्याचे गव्हर्नर अब्दूलाझीझ आयदीन (Abdulaziz Aydın) यांनी सांगितले. तर काही जणांनी हॉटेलमधील चादरी आणि ब्लँकेट एकत्र बांधून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती खाजगी एनटीव्ही चॅलनने दिली.

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घटनास्थळी अनेक अग्निशमन वाहाने दाखल झाली, यावेळी इमारतीच्या खिडक्यांमधून खाली लटकणाऱ्या चादरी पाहायला मिळाल्या.