टर्कीमधील (रिपब्लिक ऑफ टर्की) इस्तंबूल शहरात रविवारी भीषण स्फोट झाला. या स्फोटात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला असून जवळपास ८१ जण जखमी झाले आहेत. जखमींवर इस्तंबूलमधील वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहे. इस्तंबूलमधील तकसीम भागात हा स्फोट झाला आहे. या घटनेचा टर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगान यांनी तीव्र शब्दांत निषेध केला असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. या हल्ल्याच्या मागे काही कुर्दीश गट असल्याचे म्हटले जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इस्तंबूल येथील इस्तिकलाला रस्त्यावर हा भीषण स्फोट झाला असून त्यासाठी आत्मघाती बॉम्बहल्ल्याचा उपयोग झाला असावा, असा अंदाज बांधला जात आहे. याआधीही सात वर्षांपूर्वी याच भागात अनेक बॉम्बस्फोट झाले होते. पर्यटनाच्या दृष्टीकोनातून हा परिसर प्रसिद्ध असल्यामुळे हल्लेखोर याच भागाला लक्ष्य करतात.

हेही वाचा >>>विश्लेषण : गुन्हा दाखल होताच जितेंद्र आव्हाड राजीनामा देण्याच्या तयारीत, पण कलम ३५४ नेमकं आहे तरी काय?

टर्की आणि कुर्दीश गटांमध्ये मागील अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. कुर्दीश गटांना कुर्दीस्तान हा वेगळा देश हवा आहे. या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यामुळेही कुर्दीश गटाचे टर्की सरकारशी मतभेद आहेत. कुर्दीश तरुणांनी या मागणीला घेऊन हातात शस्त्रं उचललेली आहेत. कुर्दीश तरुण आपल्या संघटनाला पेशमेगा असे म्हणतात. पेशमेगाचा अर्थ ‘असे लोक जे मृत्यूचा सामना करतात’ असा आहे. पेशमेगा गटासह कुर्दीश लोकांचे अनेक गट आहेत. या गटांचीदेखील वेगळ्या तुर्कस्तानची मागणी आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : केरळ, तेलंगाणा, तामिळनाडूमध्ये राज्यपाल-सरकार वाद; राज्यपालांची नियुक्ती कोण करतं? अधिकार काय?

कुर्दीस्तानचा इतिहास काय आहे?

मध्य आशियाच्या काही भागात कुर्द समर्थक लोक आहेत. यांचा स्वत:चा असा कोणताही देश नाही. मात्र कुर्द समर्थकांची लोकसंख्या ३.५ कोटी असल्याचे म्हटले जाते. कुर्द समर्थक लोक सिरिया, टर्की, इराण, अर्मेनिया, इराक आदी देशांमध्ये आहेत. पहिले महायुद्ध संपल्यानंतर ऑटोमन साम्राज्य विखुरले. यावेळी अन्य लोकांप्रमाणे कुर्द समर्थकांना कुर्दीस्तान हा नवा देश देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र पुढे हे आश्वासन पूर्ण करण्यात आले नाही. असे असले तरी अजूनही कुर्दीश लोक नव्या कुर्दीस्तान देशाच्या मागणीसाठी आग्रही आहेत.

हेही वाचा >>> विश्लेषण : भाजपाच्या लोकांकडून आमदारांना लाच? कथित ‘डील’च्या व्हिडीओने खळबळ, चंद्रशेखर राव यांचे आरोप काय?

टर्कीमध्ये कुर्दीस्तान वर्कर्स पार्टी हे कुर्द समर्थकांचे सर्वात मोठे संघटन आहे. या पार्टीच्या विचारधारेचे लोक मागील अनेक वर्षांपासून गुरिल्ला युद्ध लढत आहेत. टर्कीमध्ये वायजीपी आणि कुर्दीस्तान वर्कस पार्टी यांना अतिरेकी संघटना मानले जाते. वेगवेगळ्या देशात कुर्द समर्थक पसरलेले आहेत. त्यांची कुर्दीस्तान या नव्या देशनिर्मितीची समान मागणी असली, तरी त्यांच्या विचारांत मतभेद आहेत. याच कारणामुळे वेगळ्या कुर्दीस्तानची मागणी पूर्ण होणे, अशक्य असल्याचे म्हटले जाते.

हेही वाचा >>> विश्लेषण : शेतात अंशत: जाळणी म्हणजे काय? त्यामुळे दिल्लीतील प्रदूषण कमी होणार?

दरम्यान, टर्की देश कुर्दीश विचारांना विरोध करतो. याच वर्षातील जुलै महिन्यात टर्कीने कुर्दीश समर्थकांच्या भागात बॉम्बहल्ले केले होते. या हल्ल्यात ८ लोकांचा मृत्यू झाला होता. तर कित्येक जण जखमी झाले होते. कुर्दीश विचारांचे लोक आणि टर्की सरकार यांच्यातील संघर्षात आतापर्यंत ४० हजार जणांचा मृत्यू झालेला आहे, असे म्हटले जाते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Turkey istanbul bomb blast know turkey and kurdish clash in detail prd