अंकारामधील तुर्की एरोस्पेस इंडस्ट्रीजच्या मुख्यालयावर बुधवारी दहशतवादी हल्ल्याची घटना घटना घडली. या हल्ल्यामागे पीकेके या कुर्दिश बंडखोरांचा हात असण्याची अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, या हल्ल्याच्या काही तासांनंतर आता तुर्कीनेही या हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं आहे. तुर्कीकडून उत्तर इराक आणि सीरियामधील कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी (PKK) च्या ठिकाणांना करण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

इराक-सीरियातील पीकेकेच्या ३० ठिकाणांना हवाई हल्ले

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, तुर्कीने उत्तर इराक आणि सीरियातील पीकेकेच्या जवळपास ३० ठिकाणांना हवाई हल्ले केल आहेत. तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयाकडून या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. या हल्ल्यादरम्यान सामान्य नागरिकांना कोणतीही इजा पोहोचार नाही, याची दक्षता घेतली गेल्याचं संरक्षण मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तुर्कीच्या या हल्ल्यानंतर अद्याप पीकेकेकडून अधिकृत प्रतिक्रिया जाहीर झालेली नाही.

हेही वाचा – तुर्कस्तानात धर्मवादी राजकारणाला शहरी मतदारांनी नाकारले? अध्यक्ष एर्दोगान यांच्या पक्षाला स्थानिक निवडणुकांत अपयश कशामुळे?

दहशतवाद्यांनी एरोस्पेस इंडस्ट्रीजच्या मुख्यालयावर केला होता हल्ला

दरम्यान, बुधवारी तुर्कस्तानची राजधानी अंकारामध्ये दोन दहशतवाद्यांनी तुर्की एरोस्पेस इंडस्ट्रीजच्या मुख्यालयावर हल्ला केला. या हल्ल्यात १० जणांचा मृत्यू तर १४ जण जखमी झाले. या ठिकाणी बॉम्बस्फोट तसेच गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नसली, तरी हा हल्ला पीकेके या कुर्दिश बंडखोरांचा गटाने केल्याचा दावा तुर्की सरकारकडून करण्यात आला होता.

हेही वाचा – विश्लेषण: तुर्कस्तानमध्ये एर्दोगन यांच्या फेरनिवडीचा परिणाम काय? युरोप, अमेरिकेसह रशियासोबत संबंधांवर फरक पडेल?

या हल्ल्यानंतर तुर्की सरकारमधील मंत्री अली येरलिकाया यांनी एक्स या समाज माध्यमावरही प्रतिक्रिया दिली होती. तुर्की एरोस्पेस इंडस्ट्रीजच्या मुख्यालयावर दहशतवादी हल्ला झाला आहे. दुर्दैवाने यात आपले काही जवान शहीद झाले आहेत. तर अनेक लोकं जखमी झाले आहेत, असे ते म्हणाले होते. तसेच अंकाराचे महापौर मन्सूर यावस यांनीही या हल्ल्यानंतर प्रतिक्रिया दिली होती. “आम्ही दहशतवादी हल्ल्याच निषेध करतो. या हल्ल्यात जे जवान शहीद झाले त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच जे जखमी आहेत. ते लवकरात लवकर बरे व्हावले यासाठी प्रार्थना करतो” असे ते म्हणाले होते.