तुर्कीत क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज म्हणून प्रसिद्ध असलेल्या थोडेक्स कंपनीचा संस्थापक देश सोडून पळून गेल्यानं अनेक गुंतवणूकदारांना धक्का बसला आहे. बिटकॉईनमधील घसरणीमुळे गेल्या आठवड्यात तुर्कीच्या केंद्रीय बँकेनं देशात क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून खरेदीला बंदी घातली होती. या निर्णयानंतर गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. यानंतर पोलिसांनी इस्तंबूलमधील थोडेक्स कंपनीच्या मुख्य कार्यालयावर छापा टाकला. मात्र २७ वर्षीय संस्थापक फारुख फातिह ओझर हा देश सोडून फरार झाल्याचं समोर आलं आहे. यामुळे गुंतवणूदारांच्या पायाखालची जमीन सरकरली आहे. सरकारने कंपनीची सर्व बँक खाती सील केली आहेत.
तुर्कीच्या स्थानिक वृत्तपत्र असलेल्या हेबरटर्कच्या बातमीनुसार २ बिलियन डॉलर्सचं नुकसान झाल्याचं दिसतंय. तर पीडितांचे वकीलांनी ३, ९०,००० गुंतवणूकदारांचे पैसे बुडल्याचा दावा केला आहे. कंपनीच्या वेबसाईटनं ३० हजार गुंतवणूकदारांना फटका बसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे यात किती गुंतणूकदारांनी गुंतवणूक केली होती आणि त्याचा काय परिणाम झाला आहे, याबाबत अजूनही संभ्रम आहे.
Zydus Cadila च्या विराफीन औषधाला भारतात परवानगी! ७ दिवसांत करोना पेशंट निगेटिव्ह; कंपनीचा दावा!
दुसरीकडे थोडेक्सचा संस्थापक फारुख फातिह ओझर याने गुंतवणूकदारांना पैसे परत करण्याचं आश्वासन दिलं आहे. परतफेड केल्यानंतर देशात परतेन आणि न्यायालयासमोर जाईल असं त्याने सांगितलं आहे. त्याच्या वक्तव्यावर किती विश्वास ठेवायचा असा प्रश्न गुंतवणूकदारांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे अनेकांना आपले पैसे बुडाल्याची जाणीव झाली आहे.
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत दोन महिने मोफत धान्य
क्रिप्टो करन्सी म्हणजे काय?
आभासी चलन ही संकल्पना आता जवळपास दशकभर जुनी झाली आहे. त्यामुळे आभासी चलन म्हणजे काय, हे बहुतेकांना माहीत असेलच. आभासी चलन अर्थात ‘क्रिप्टोकरन्सी’ हे संगणकीय अल्गोरिदमच्या आधारे निर्माण करण्यात आलेले चलन आहे. या चलनाला भौतिक रूप नसते. मात्र, तुम्ही आर्थिक देवाणघेवाणीसाठी ते वापरू शकता. २००९ मध्ये सातोशी नाकामोतो नावाच्या एका अभियंत्याने ‘बिटकॉइन’ची संकल्पना जन्माला घातली. आभासी चलनाद्वारे केलेले आर्थिक व्यवहार अतिशय गोपनीय असतात. या चलनाच्या व्यवहारांसाठी कोणत्या बँकेशी संलग्न राहण्याची आवश्यकता नाही. विकेंद्रित व्यवस्था असल्याने या आभासी चलनावर कोणा एका कंपनीची वा देशाची मक्तेदारीही नाही.