टर्की आणि लगतच्या सीरीया देशात सोमवारी विनाशकारी भूकंप आला आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत १७ हजाराहून अधिक लोकांचा जीव गेला आहे. नैसर्गिक आपत्तीची घटना घडताच भारत सरकारने टर्की आणि सीरीयाला मदतीचा हात देऊ केला आहे. भारतीय लष्कर आणि बचाव दल पथकं वैद्यकीय साहित्य घेऊन टर्कीला रवाना झालं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बचाव कार्य सुरू असताना सोशल मीडियावर टर्कीश महिलेचा मन जिंकणारा फोटो व्हायरल झाला आहे. संबंधित फोटोत टर्कीश महिला भारतीय सैन्याच्या महिला अधिकाऱ्याला मिठी मारताना दिसत आहे. तिने महिला अधिकाऱ्याला मिठी मारल्यानंतर गालावर चुंबनही केलं आहे. हा फोटो सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं आहे. खरं तर, भारत सरकारने भूकंपग्रस्त देशात बचाव आणि मदत कार्यासाठी ‘ऑपरेशन दोस्त’ची घोषणा केली आहे.

या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर आणि बचाव दल विविध वैद्यकीय साहित्य घेऊन टर्कीला रवाना झालं आहे. माणुसकीच्या नात्यातून भारतीय जवानांचं कार्य पाहून टर्कीश महिलेनं भारतीय लष्कराच्या महिला अधिकाऱ्याला मिठी मारली, तसेच त्यांच्या गालावर किस केलं आहे. टर्कीश महिलेचा हा फोटो मन जिंकत आहे.

भूकंपग्रस्त टर्की आणि सीरिया या दोन्ही देशांत आतापर्यंत १७ हजार १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. या दुर्घटनेत टर्कीमध्ये अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Turkish woman hugged and kiss indian army woman officer viral video rmm