चक्क २७ लाख रुपयांचा टेलिव्हिजन येतोय? होय. टेलिव्हिजन निर्मिती क्षेत्रातील सोनी, सॅमसंग आणि एलजी या अग्रेसर कंपन्या अत्याधुनिक टेलिव्हिजन निर्मितीत क्षेत्रात एक पाऊल टाकत अल्ट्रा एचडी हाय डेफिनेशन(यूएचडी) टेलिव्हिजन सेटची निर्मिती करण्यावर भर देत आहेत. तसेच मोठ्या स्क्रिनकडे वळणारी टेलिव्हिजन संस्कृती लक्षात घेऊन टेलिव्हिजन कंपन्या या यूएचडी टेलिव्हिजनची स्क्रिनही तितकीच मोठी असणार आहे.
त्यानुसार निर्मितीप्रक्रिया सुरू असून लवकरच हे अल्ट्रा एचडी टीव्हीसेट्स बाजारात दाखल होणार आहेत. या टेलिव्हिजनची किंमत तब्बल सतरा ते सत्तावीस कोटी रुपयांच्या घरात असणार आहे. तर, या टेलिव्हिजनची स्क्रिन ८५ इंचाची असणार आहे.
सध्या मोठ्या स्क्रिनच्या टेलिव्हिजन्स् ची मागणी वाढत आहे. बाजारात ५५ इंचाचे टेलिव्हिजन्स उपलब्ध आहेत. आता त्यापेक्षा मोठ्या स्क्रिनची निर्मिती करण्याच्या उद्देशाने टेलिव्हिजनची एचडी क्षमताही तितकीच असणे गरजेचे आहे. असे सोनी इंडियाचे व्यवस्थापक ताडाटो किमुरा यांनी स्पष्ट केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा