Twin Brother Robbery Trick Busted : मध्य प्रदेशमध्ये एकमेकांसारखे दिसणाऱ्या दोघांनी गुन्हे करण्यासाठी एक विशेष युक्ती वापरल्याचे प्रकरण समोर आले आहे. दिशाभूल करण्यासाठी या जुळ्या भावांनी वापरलेली ही युक्ती पोलिसांच्या लक्षात येण्यासाठी बराच वेळ बराच वेळ लागला. पण नेमका प्रकार लक्षात आल्यानंतर पोलि‍सांनीही डोक्याला हात लावले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांपैकी एक भाऊ हा गुन्हा करायचा तर त्याच वेळी दुसरा भाऊ हा दुसरीकडे कुठेतरी आपण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होऊ याची काळजी घेत असे. यानंतर गुन्ह्याशी आपला काहीही संबंध नाही हे सिद्ध करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज वापरलं जाई. त्यामुळे या गुन्ह्याची उकल करणे पोलिसांसाठी आव्हान बनले होते.

दरोड्यात हात असलेला एक भाऊ सापडला तर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधील व्हिडिओ पुरावा म्हणून सादर केला जात असे आणि आपण गुन्हा घडला त्या ठिकणी नव्हतोच असे भासवून निर्दोष सुटका करून घेतली जात असे. अनेक दिवसांपासून पोलिसांना यामगील गूढ सुटत नव्हते. पण अखेर पोलिासांना या मागचे रहस्य लक्षात आले आणि सौरभ वर्मा आणि संजीव वर्मा या दोघांना अटक करण्यात आले आहे.

जुळ्या भावांनी २३ डिसेंबर मऊगंज शहरातील एका बंद घरात चोरी केली होती. त्यांन घरातून लाखो रुपये किंमतीचे मौल्यवान साहित्य चोरले होते. ज्यामध्ये दागिने आणि रोख रकमेचा देखील समावेश होता.

या घटनेनंतर मोठ्या प्रमाणावर शोधमोहिम राबवण्यात आली होती, ज्यामध्ये सौरभ वर्मासहित तीन जणांना अटक करण्यात आली. मात्र या प्रकरणात संजीव पोलीस स्टेशनमध्ये आला आणि दावा केला की ही तोच व्यक्ती आहे ज्याला पोलिसांनी अटक केली आहे.

हेही वाचा>> “महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना हे शोभत नाही”, प्राजक्ता माळीचा सुरेश धसांच्या विधानावर संताप, पत्रकार परिषदेत झाले अश्रू अनावर!

एक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की संजीवला पाहून अधिकाऱ्यांमध्ये संशयाची स्थिती निर्माण झाली. त्यांना सुरूवातीला वाटलं की आरोपी त्यांच्या तावडीतून निसटून गेला आहे. पण सखोल चोकशी केल्यानंतर जुळ्या भावांचे बिंग फुटले.

दोघा भावांनी आपलं सत्य बाहेर येऊ नये यासाठी खूप प्रयत्न केले. एकसारखे कपडे घातले इतकेच नाही तर संशय येऊ नये म्हणून कधीच एकत्र आले नाहीत. त्यांचे प्लॅनिंग इतके जबरदस्त होते की काही मोजक्या लोकांनाच ते जुळे असल्याचे माहिती होते. मात्र आता अटक झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींकडून लाखो रुपयांचे दागिने जप्त केले आहेत .