भारतात सोशल मीडिया कंपन्यांसाठी नवी नियमावली लागू केल्यापासून रोज नवे वाद समोर येत आहेत. त्यात सरकारने कठोर अंमलबजावणी करण्यास सुरुवात केल्याने सोशल मीडिया कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. तक्रारींसाठी विशेष अधिकारी आणि नोडल अधिकारी यांची नियुक्ती करणं आवश्यक आहे. तसेच अधिकाऱ्यांचं कार्यक्षेत्र भारतात असण्याची अट आहे. ट्विटरचे अंतरिम विशेष अधिकारी धर्मेंद्र चतुर यांनी आपल्या पदचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झालं होतं. त्या पदावर आता ट्विटरने जेरेमी केसल यांची या पदावर नियुक्ती केली आहे. गेल्या काही दिवसांपासून धर्मेंद्र चतुर यांचे नाव वेबसाईटवर दिसत नव्हते. केसल यांच्याकडे ग्लोबल लीगल पॉलिसी डायरेक्टर पदही आहे. त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवल्याने त्यांना आता भारतीय युजर्सच्या तक्रारी सोडवाव्या लागणार आहेत. जेरेमी केसल सध्या कॅलिफोर्नियात असल्याने नव्या नियमात बसत नाही. नव्या नियमांनुसार विशेष अधिकऱ्याचं निवासस्थान भारतात असणं गरजेचं आहे.
धर्मेंद्र चतुर यांच्या राजीनाम्यानंतर जेरेमी केसल यांची ट्विटरच्या विशेष अधिकारीपदी नियुक्ती
ट्विटरचे अंतरिम विशेष अधिकारी धर्मेंद्र चतुर यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झालं होतं. त्या पदावर आता ट्विटरने जेरेमी केसल यांची या पदावर नियुक्ती केली आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 28-06-2021 at 14:11 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Twitter appoints jeremy kessel as grievance officer for india rmt