प्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क (Elon Musk) मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट ट्विटर विकत घेणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. पण ट्विटर विकत घेण्याची डील तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. मस्क यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. याचे परिणाम शेअर मार्केटमध्येही दिसून आले आहेत. यामुळे शेअर्स प्रीमार्केट ट्रेडिंगमध्ये २० टक्क्यांनी घसरले आहेत.

ट्विटरवर सध्या ५ टक्क्यांहून कमी स्पॅम आणि बनावट अकाऊंट्स आहेत. या अकाऊंट्सची माहिती अद्याप ट्विटरकडून आपल्या टीमला मिळाली नसल्याने ट्विटर खरेदीची डील तात्पुरती स्थगित करण्यात आली असल्याचे मस्क यांनी ट्विटमध्ये म्हणले आहे.

४४ अब्ज डॉलर्सना खरेदी केले ट्विटर
इलॉन मस्क यांनी मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर ४४ अब्ज डॉलर्समध्ये (३ लाख ३७ हजार कोटी रुपयांहून अधिक) खरेदी केली आहे. हा करार पूर्ण होताच इलॉन मस्क यांचे ट्विटरवर पूर्ण नियंत्रण असेल आणि ट्विटर ही खासगी कंपनी बनेल. त्यामुळे आता ट्विटरवर मोफत सेवा मिळणार की नाही? हा प्रश्न युजर्संना पडला आहे. याबाबत आता इलॉन मस्क यांनी ट्वीट करून सांगितलं आहे की, या प्लॅटफॉर्मचा व्यावसायिक आणि सरकारी युजर्संना त्याच्या वापरासाठी पैसे खर्च करावे लागतील. तर सामान्य युजर्सबाबतही त्यांनी आपलं मत स्पष्ट केलं आहे.

ट्विटरसाठी नवीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची निवड
इलॉन मस्क यांनी ट्विटरसाठी नवीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची निवड केली आहे. मस्क यांनी निवड केलेली व्यक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवालची जागा घेणार आहे. मात्र, मस्क यांनी त्या व्यक्तीचे नाव सांगण्यास नकार दिला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जॅक डॉर्सीच्या जागी पराग अग्रवाल यांची ट्विटरचे नवे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

Story img Loader