देशात द्वेषमूलक प्रचार करण्यासाठी ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअप आणि अन्य समाजमाध्यमांचा अनेकदा मोठय़ा प्रमाणावर गैरवापर करण्यात आल्याचे बुधवारी सरकारने राज्यसभेत सांगितले. सदर समाजमाध्यमांचा गैरवापर मोठय़ा प्रमाणावर झाल्याचे सरकारच्या वेळोवेळी निदर्शनास आले आहे. विविध संकेतस्थळांवर प्रक्षोभक, द्वेषमूलक साहित्याचा प्रसार परदेशातूनही करण्यात आल्याचे आढळले आहे, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री हरिभाई चौधरी यांनी सांगितले. तथापि, समाजमाध्यमांवरील साहित्याचे सरकार नियमन करू शकत नाही, असेही सरकारने स्पष्ट केले.

Story img Loader