इलॉन मस्क यांनी ट्विटरचे अधिग्रहण केल्यानंतर कंपनीमध्ये अतिशय वेगात घडामोडींना सुरुवात झाली आहे. सुरुवातीस त्यांनी सीईओ पराग अग्रवाल यांनाच बाहेरचा रस्ता दाखवला. एवढ्यावर न थांबता त्यानंतर त्यांनी सीएफओ नेड सेगल, पॉलिसी चीफ विजया गड्डे यांनाही डच्चू दिला. आता हे गंडांतर ट्विटरच्या कर्मचाऱ्यांवर आलं असून भारतातील कर्मचारी कपात करण्यास ट्विटरने सुरुवात केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मार्केटींग, संवाद (कम्युनिकेशन) आणि इतर काही विभागातील कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढून टाकण्याचा निर्णय ट्विटरने घेतला आहे. नेमक्या किती कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढून टाकण्यात येणार आहे? हे अद्याप स्पष्ट झालं नाही. पण त्यांनी भारतातील ट्विटर कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढून टाकण्यास सुरुवात केल्याचं समजत आहे.

‘एएनआय’ वृत्तसंस्थेला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतातील ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढून टाकण्याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता देण्यात आली नाही. ट्विटरचे नवीन मालक इलॉन मस्क यांच्या आदेशावरून संबंधित कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढलं जाणार आहे. हा एक जागतिक पुनर्रचनेचा भाग असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. सध्या ट्विटर कंपनीत ७५०० हून अधिक कर्मचारी काम करतात. यातील जवळपास निम्म्या कर्मचाऱ्यांना डच्चू देण्याचा निर्णय इलॉन मस्क यांनी घेतला आहे.

हेही वाचा- असे काय आहे की, त्यामुळे ट्विटरचे कर्मचारी वाट पाहाताहेत ९ वाजण्याची?

खरं तर, ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना यापूर्वीच एक ‘मेमो’ मेलवर आला असून त्यात ही कार्यवाही ‘दुर्दैवी पण आवश्यक’ असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. आवश्यकतेपेक्षा दुप्पट कर्मचारीवर्ग असल्याचे या मेमोमध्ये म्हटले आहे. ट्विटरच्या वाढीसाठी म्हणूनच कर्मचारी कपात हा महत्त्वाचा मार्ग आहे, असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे.