अवघ्या आठ वर्षांत निळय़ा रंगाच्या चिमणीने सोशल मीडियामध्ये आपले स्थान अबाधित केले. एका छोटूशा घरटय़ातून उडालेली ही सोशल मीडियाची चिमणी आता जगभरातील सर्वच देशांमधील केवळ शहरांमध्येच नव्हे तर गावागावांमध्ये फिरू लागली आहे. ही चिमणी आहे ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइटची.
‘जस्ट सेटिंग अप माय ट्विटर’ या ट्विटने सह संस्थापक जॅक डोर्सी याने २१ मार्च २००६ रोजी ट्विटर ही मायक्रो ब्लॉगिंग साइट सुरू केली. याच साइटची ओठख आठ वर्षांमध्ये विचारवंतांना विचार मांडण्यासाठीचे व्यासपीठ म्हणून झाली आहे. आठ वर्षांपूर्वी केवळ १४० अक्षरांमध्ये आपले मत मांडण्याची जागणा देणाऱ्या या वेबसाइटवर तब्बल आठ वर्षांमध्ये आता तुम्ही व्हिडीओ, फोटोही शेअर करू शकता. यामुळे माणसांचे माणसांमधील खरे नातेही जोडले गेले आणि तुम्ही मुक्तपणे यावर व्यक्तही होऊ लागले, अशी प्रतिक्रिया ट्विटर इंडियाचे विपणन संचालक ऋषी जेटली यांनी ब्लॉगवर दिली आहे.

Story img Loader