जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर ४४ अब्ज डॉलर्समध्ये (३ लाख ३७ हजार कोटी रुपयांहून अधिक) खरेदी केली आहे. हा करार या वर्षी पूर्ण होईल. हा करार पूर्ण होताच इलॉन मस्क यांचे ट्विटरवर पूर्ण नियंत्रण असेल आणि ट्विटर ही खासगी कंपनी बनेल. त्यामुळे आता ट्विटरवर मोफत सेवा मिळणार की नाही? हा प्रश्न युजर्संना पडला आहे. याबाबत आता इलॉन मस्क यांनी ट्वीट करून सांगितलं आहे की, या प्लॅटफॉर्मचा व्यावसायिक आणि सरकारी युजर्संना त्याच्या वापरासाठी पैसे खर्च करावे लागतील. तर सामान्य युजर्सबाबतही त्यांनी आपलं मत स्पष्ट केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

इलॉन मस्क यांनी कराराची घोषणा करताना दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, “भाषण स्वातंत्र्य हा कार्यरत लोकशाहीचा आधारस्तंभ आहे आणि ट्विटर हा डिजिटल टाउन स्क्वेअर आहे जिथे मानवतेच्या भविष्यासाठी महत्त्वाच्या बाबींवर चर्चा केली जाते. नवीन वैशिष्ट्यांसह विश्वास वाढवण्यासाठी अल्गोरिदम ओपन सोर्स बनवायचं आहे. तसेच स्पॅम बॉट्सवर मात करून सर्वांना प्रमाणीकृत करून ट्विटरला पूर्वीपेक्षा चांगले बनवायचे आहे.” आता इलॉन मस्क यांनी ट्विट केले आहे की, “ट्विटर नेहमी सामान्य युजर्ससाठी विनामूल्य असेल, परंतु व्यावसायिक/सरकारी युजर्संना थोडासा खर्च होऊ शकतो.”

इलॉन मस्क यांनी ट्विटरसाठी नवीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची निवड केली असल्याची माहिती समोर आली आहे. मस्क यांनी निवड केलेली व्यक्ती ट्विटरची ४४ अब्ज डॉलरमध्ये विक्री पूर्ण झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवालची जागा घेणार आहे. मात्र मस्क यांनी त्या व्यक्तीचे नाव सांगण्यास नकार दिला आहे. रॉयटर्सने सुत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. मस्क यांनी गेल्या महिन्यात ट्विटरचे अध्यक्ष ब्रेट टेलर यांना सांगितले की कंपनीच्या व्यवस्थापनावर त्यांचा अजिबात विश्वास नाही. सिक्युरिटी एक्स्चेंज कमिशन मध्येही मस्क यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली होती. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जॅक डॉर्सीच्या जागी पराग अग्रवाल यांची ट्विटरचे नवे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. अग्रवाल यांना १२ महिन्यांआधीच काढून टाकले तर कंपनीला त्यांना ३८.७ अब्ज डॉलर (सुमारे २९६ कोटी रुपये) द्यावे लागतील. मात्र, कराराची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पराग अग्रवाल या पदावर राहतील.