आजच्या पिढीसाठी व्यक्त होण्याचे लोकप्रिय माध्यम असणाऱ्या ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटची विक्री होणार असल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. सीएनबीने दिलेल्या वृत्तानुसार, सोशल माध्यमात लोकप्रिय असणारी ट्विटर कंपनी विक्रीसंदर्भात सध्या गुगल व सेल्सफोर्स डॉट.कॉम तसेच अन्य कंपन्यांच्या संपर्कात आहे. मात्र  गुगल, सेल्सफोर्स  व अन्य कोणत्याही कंपनीने या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून ट्विटर कंपनीची आर्थिक अवस्था बिकट आहे. त्यातच कंपनीतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील कंपनीला रामराम ठोकला आहे. त्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आजच्या घडीला ३१३ मिलियन ट्विटरचे वापरकर्ते असून विक्रीच्या वृत्तानंतर हा आकडा ३ टक्के वाढला आहे. आज जगातील अनेक महत्त्वाच्या व्यक्ती, सरकारे, संस्थांसाठी ट्विटर हे महत्त्वपूर्ण व्यासपीठ बनले आहे. परिणामी दिवसभरात कोटीच्या घरात ट्विट केले जाते. वापरकर्त्यांना त्यांच्या भावना मांडण्यासाठी १४० कॅरॅक्टर्सचाअवकाश प्राप्त करून देणाऱ्या ट्विटरचा सध्याच्या जमान्यात चांगलाच बोलबाला आहे. २१ मार्च २००६ साली ट्विटरचा सहसंस्थापक जॅक डॉर्सीने ‘जस्ट सिटिंग अप माय ट्विटर’ असे पहिले ट्विट केले होते. याचवर्षी ट्विटरने आपली दशकपूर्ती साजरी केली आहे. त्यामुळे दशक पूर्तीनंतर ट्विटरचा ताबा नक्की कोणाकडे जाणार याबद्दल वापरकर्त्यांसोबतच शेअर गुंतवणूकदारांमध्ये देखील उत्सुकता लागली आहे.

सध्या गुगल आणि सेल्सफोर्स या कंपनीपैकी एखादी कंपनी ट्विटरवरला आपल्या ताब्यात घेईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.