ओडिशाच्या कोरापूटमधील दोघांना अँथ्रॅक्स या संसर्गजन्य या आजाराची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. त्यांच्यावर एसएलएन वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. १४ जून रोजी अँथ्रॅक्समुळे मरण पावलेल्या प्राण्याचे मांस खाल्याने या दोघांना हा आजार झाल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच या गावातील इतर १० कुटुंबांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, अँथ्रॅक्स या संसर्गजन्य या आजाराच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आरोग्य तज्ज्ञांचे एक पथक कोरापूटमधील कुटिंगा या गावात पाठवण्यात आले आहे. याच गावात अँथ्रॅक्स या संसर्गजन्य रोगाचे रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, अँथ्रॅक्स हा गंभीर जीवाणूजन्य आजार असून वेळेवर उपचार न घेतल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
हेही वाचा – Rain Updates: अयोध्येत राम मंदिरापाठोपाठ श्रीराम रुग्णालयालाही पावसाचा फटका; Video मध्ये पाहा दयनीय अवस्था
दरम्यान, अँथ्रॅक्स हा आजार एखाद्या संक्रमित प्राण्याला स्पर्श केल्यानेही होऊ शकतो. तसेच संक्रमित प्राण्याचे मांस खाल्यामुळेही होऊ शकतो. इतकचं नाही तर अँथ्रॅक्स या आजाराने संक्रमित असलेल्या प्राण्याच्या संपर्कात आल्यानंतरही हा आजार होऊ शकतो. मात्र, हा आजार सहसा प्राण्यांमध्ये आढळून येतो. अँथ्रॅक्स या आजाराची लक्षणे हे १ ते ७ दिवसांत दिसतात.
कोरापुट अतिरिक्त जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितलं की, “अँथ्रॅक्समुळे मरण पावलेल्या प्राण्याचे मांस खाल्याने या दोघांना हा आजार झाल्याचं समोर येत आहे. मात्र, त्यानंतर दुसऱ्या अशा प्रकारच्या केस समोर आलेल्या नाहीत. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. तसेच येथील ग्रामस्थांना अँथ्रॅक्स रोगाविरूद्ध प्रतिबंधात्मक उपायांबद्दल जागरूक करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.”
हेही वाचा – VIDEO : दिल्लीनंतर आता गुजरातमध्येही मोठी दुर्घटना; मुसळधार पावसामुळे राजकोट विमानतळावरील छत कोसळले
ओडिशाच्या कोरापुटमध्ये दोन लोकांना अँथ्रॅक्स या आजाराची लक्षणे समोर आल्यानंतर प्रशासन अलर्ट झालं आहे. पुढील काही दिवस या आजारासंदर्भात आरोग्य अधिकारी गाव आणि आसपासच्या भागात लक्ष ठेवून असणार आहेत.
काय आहेत अँथ्रॅक्स या आजाराजी लक्षणे?
अँथ्रॅक्सचा संसर्ग झाल्यास, १ ते ७ दिवसांच्या त्याची लक्षणं दिसून येतात. जर हा संसर्ग झाल्यास त्वचेवर फोड किंवा मुरुम येऊ शकतात. तसेच घश्यात सूज, खोकला, ताप किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. यासाठी त्वरित उपचार आवश्यक आहेत. योग्य उपचार न दिल्यास रुग्ण दगावण्याची देखील शक्यता असते.