जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ झालेल्या ग्रेनेड हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत कर्तव्य बजावत असणाऱ्या दोन लष्करी अधिकाऱ्यांना वीरमरण आले आहे. तर अन्य पाच जवान जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. वीरमरण आलेल्यांमध्ये लष्करातील एक कॅप्टन आणि एका ज्युनियर कमिशन्ड ऑफिसरचा समावेश आहे. हल्ल्यानंतर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा- भारतात मंकीपॉक्सनं चिंता वाढवली; ‘या’ ठिकाणी आढळला दुसरा रुग्ण

पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या चौकीवर दहशतवादी हल्ला
याआधी रविवारी काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या चौकीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात एक सहायक उपनिरीक्षक (एएसआय) शहीद झाले होते. तर अन्य एक प्रवासी जखमी झाला होता. घटनेनंतर लगेचच संपूर्ण परिसराची नाकाबंदी करून शोध मोहीम सुरू करण्यात आली. शहीद एएसआय विनोद कुमार हे उत्तर प्रदेशातील फारुखाबाद जिल्ह्यातील रहिवासी होते.

हेही वाचा- जीएसटीच्या दरांवरून राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका; म्हणाले, “हा अर्थव्यवस्था नष्ट करणाचा … ”

या महिन्यात सुरक्षा दलांवर दोन हल्ले, दोन जवान शहीद
अमरनाथ यात्रा सुरु झाल्यानंतर जुलै महिन्यात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर दोनदा हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये दोन जवान शहीद झाले आहेत, तर दोन जवान आणि एक नागरिकही जखमी झाला आहे. १२ जुलै रोजी श्रीनगरच्या लाल बाजार भागात पोलिसांच्या नाका चौकीवर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात पोलीस एएसआय मुश्ताक अहमद यांनी वीरमरण आले होते. तर अन्य दोन जवान जखमी झाले होते.

Story img Loader