केंद्रीयमंत्री आणि नॅशनल कॉन्फरंस पक्षाचे श्रीनगर-बडगाव मतदारसंघाचे उमेदवार डॉ. फारूख अबदुल्ला यांच्या मागाम भागातील प्रचरसभेमध्ये आज (रविवार) दोन स्फोट घडवण्यात आले. बस थांब्यावर झालेल्या ग्रेनेडच्या या स्फोटांमध्ये १५ जण जखमी झाले असल्याची भिती वर्तवण्यात आली असून, कोणतीही जीवितहानी झाली नाही. फारूख अबदुल्लाह रविवारी दुपारी या सभेला संबोधीत करणार होते.
हा स्फोट सकाळी ११.४० वाजता झाला असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. जखमींना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात हलवण्यात आले आहे.      

Story img Loader