चीनच्या दोन अंतराळवीरांनी अंतराळात स्पेसवॉक करत नवा इतिहास रचला आहे. लियु बोमिंक आणि तांग होंग्बो या दोघांनी एअरलॉकमधून बाहेर पडत स्पेसस्टेशनवर काम केलं. रोबोटिक आर्मची सेटिंग करण्यासाठी ते बाहेर आले होते. या दोघांनी १५ मीटर लांब रोबोटिक आर्म इन्स्टॉल केला. तर तिसरे क्रू मेंबर कमांडर निए हॅशेंग आतच होते. यावेळी टिपलेल्या दृश्यांमधून अंतराळातून पृथ्वी दिसत आहे. चीनच्या सरकारी टिव्हीने हे फुटेज दाखवले आहेत. चीनचे तीन अंतराळवीर १७ जूनला तिसऱ्या ऑर्बिटल स्टेशनवरील कामासाठी तीन महिन्यांच्या मिशनवर आहेत. हा चीनचा सर्वात मोठा महत्त्वाकांक्षी स्पेस प्रोजेक्ट आहे. त्याचबरोबर मे महिन्यात मंगळावर रोबोट पोहोचवण्यास या प्रोजेक्टची मदत घेतली जाणार आहे.
चीननं स्पेस स्टेशनसाठी पहिलं मॉडेल तियानहे हे २९ एप्रिलला लॉन्च केलं होतं. त्यानंतर ऑटोमेटेड स्पेसक्राफ्ट खाणं आणि इंधनासाठी लॉन्च केलं गेलं. त्यानंतर १७ जूनला तीन अंतराळवीरांसह शेनजोउ-१२ कॅप्सूल अंतराळात पाठवण्यात आलं. यात रोबोटिक आर्म इन्स्टॉल करण्याची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यात अंतराळवीरांना यश मिळालं आहे. या कामगिरीसाठी अंतराळवीरांना खास स्पेस सूट डिझाइन करण्यात आला आहे. गरजेच्या वेळी सहा तास रिकाम्या जागेवर यामुळे काम करता येतं. या रोबोटिक आर्ममुळे इतर स्पेसस्टेशन निर्मितीसाठी मदत होणार आहे.
चीनचं नवं स्पेसस्टेशन पुढील वर्षात पूर्ण होणार आहे. या स्थानकामुळे चीन संपूर्ण जगावर नजर ठेवू शकणार आहे. तसेच जुन्या होत असलेल्या आंतरराष्ट्रीय स्थानकाची स्पर्धा करू शकणार आहे. चीननं गेल्या काही दिवसात अंतराळात आपली मजबूत पकड मिळवून दाखवली आहे. चीनची अंतराळातील कामगिरी सगळ्या जगाचं लक्ष वेधून घेत आहे. चीनमध्ये सत्तारुढ कम्युनिस्ट पार्टीने नुकतीच स्थापनेची १०० वर्षे पूर्ण केली आहेत.