एप्रिल व जून असे दोनदा चीनची दोन हेलिकॉप्टर्स उत्तराखंडमध्ये येऊन गेली व त्यानंतर आपल्या लष्कराने चिनी लष्कराकडे निषेध नोंदवला अशी माहिती राज्यसभेत देण्यात आली.
संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले, की भारत व चीन यांच्यात प्रत्यक्ष ताबा रेषेबाबत वाद असल्याने अशा प्रकारे सीमा ओलांडण्याचे प्रकार होतात. ३० एप्रिलला व १३ जूनला असे दोनदा चीनची हेलिकॉप्टर्स भारताच्या हद्दीत उत्तराखंडमध्ये येऊन गेली. त्याबाबत ५ मे व २३ जून रोजी झालेल्या ध्वज बैठकांमध्ये भारतीय लष्कराने चिनी लष्कराकडे निषेध नोंदवला.
अशा प्रकारच्या घटना चीनकडे ध्वज बैठका, सीमा सुरक्षा अधिकारी बैठका व राजनैतिक मार्गाने उपस्थित केल्या जात असतात. गेल्या काही वर्षांत चीनकडून सीमा ओलांडली गेल्याच्या अशा अनेक घटना घडल्या आहेत असेही ते म्हणाले.दोन्ही देशांमध्ये सीमा संरक्षण सहकार्य करार असून त्यामुळे ४,००० कि.मी.च्या सीमेचे रक्षण करताना संघर्ष टाळण्याची व्यवस्था आहे, असेही त्यांनी सांगितले.नौदल व विमानतळाबाबत विचारलेल्या प्रश्नांबाबत त्यांनी सांगितले, की त्यांचे सुरक्षा परीक्षण करण्यात आले असून तेथे सतर्कता बाळगण्यात येत आहे, सुरक्षेसाठी दरवर्षी पुरेसा निधी दिला जात आहे.

Story img Loader