सुकमा : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी ‘आयईडी’चा वापर करून रविवारी एक ट्रक उडवून दिला. यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ‘कोब्रा’ शाखेचे दोन जवान शहीद झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. सिल्गर आणि टेकलगुडेम छावण्यांच्यादरम्यान तिम्मनपुरम गावाजवळ दुपारी तीनच्या सुमाराला हा स्फोट घडवण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> ‘नीट’चा तपास सीबीआयकडे; अज्ञात व्यक्तींविरोधात एफआयआर दाखल

‘कोब्रा’चे जवान मोटारसायकलींवरून जागरगुंडा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील सिल्गर छावणीपासून टेकलगुडेमच्या दिशेने गस्त घालत होते. ट्रकमध्ये त्यांचे सामान होते. त्यावेळी नक्षलवाद्यांनी ट्रकला लक्ष्य केले. स्फोटात हवालदार शैलेंद्र आणि ट्रकचालक विष्णू मारले गेले. स्फोटाची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी आणखी कुमक पाठवण्यात आली. जवानांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून शोधमोहीम सुरू करण्यात आली अशी माहिती पोलिसांनी दिली. छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले असून जवानांचे हौतात्म्य वाया जाणार नाही असे सांगितले. ‘‘बस्तर भागात नक्षलवादी मोहीम सुरू असल्यामुळे नक्षलवादी वैफल्यग्रस्त झाले आहेत आणि नैराश्यातून अशा प्रकारची भ्याड कृत्ये करत आहेत. जवानांचे हौतात्म्य वाया जाणार नाही. नक्षलवादाचे निर्मूलन झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही’’, असे त्यांनी ‘एक्स’वर लिहिले.