उत्तर प्रदेशातील कानपूरमधील हिंसाचारानंतर रविवारी आग्रा येथील वातावरणही बिघडले. आग्रा येथे दुचाकींच्या किरकोळ धडकेनंतर दोन समुदायांमध्ये हाणामारी झाली आणि जोरदार दगडफेक झाली. ताजगंजच्या बसई खुर्द भागात रस्ता तयार होत असून दोन्ही बाजूला फरशा पडल्या आहेत. एक मोटारसायकलस्वार तिथून जात होता त्यावेळी ही घटना घडली. सुरुवातीला दोन आणि नंतर त्यांचे कुटुंबीय आणि पाहता पाहता वस्तीत राहणारे दोन्ही समाजाचे लोक एकमेकांशी भिडले. मात्र, पोलिसांनी वेळीच हे प्रकरण मिटवले.

आग्रा येथील ताजगंज येथील बसई खुर्द येथे रविवारी सायंकाळी दुचाकीची धडक बसल्याने दोन तरुणांमध्ये वाद झाला. तरुणाचे कुटुंबीयही तेथे पोहोचले, त्यांनीही मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर दोन्ही बाजूचे लोक एकमेकांवर दगडफेक करतानाही दिसले. वरिष्ठ पोलीस अधीक्षकांसह अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी हे प्रकरण चिघळण्यापासून रोखले.

रविवारी सायंकाळी ही घटना घडली. बसई खुर्दमध्ये रस्ता खोदण्यात आला आहे. तेथे फरशी बसवण्याचे काम सुरू आहे. बसई खुर्द येथे राहणारा सादिक हा दुचाकीवरून घरी येत होता. खोदकामामुळे त्यांची दुचाकी समोरून येणाऱ्या राधेश्यामला धडकली. यावरून दोघांमध्ये वाद झाला.

यानंतर राधेश्याम आणि सादिकचे नातेवाईकही या ठिकाणी पोहोचले. त्यांच्यात मारामारीही सुरू झाली. दोन समाजात हाणामारी झाल्याची माहिती कोणीतरी पोलिसांना दिली. वरिष्ठ पोलीस अधीक्षक सुधीर कुमार फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. सुधीर कुमार म्हणाले की, हा दोन समुदायातील संघर्ष नाही. आयजी रेंज नचिकेता झा, एसएसपी सुधीर कुमार, एएसपी सत्य नारायण, सीओ सदर राजीव कुमार, सीओ लोहमंडी अर्चना सिंग आदींनी ताजगंजसह शहरातील इतर भागात पायी गस्त घातली. या घटनेत ४ आरोपींना अटक करण्यात आल्याचे आग्रा पोलिसांनी सांगितले आहे. घटनास्थळी शांतता असून पोलीस बंदोबस्त तैनात आहे.

Story img Loader