शुक्रवारी रात्री केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ) जवानांच्या ताफ्यावर मणिपूरमधील कुकी बंडखोरांकडून हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात सीआरपीएफच्या दोन जवानांना वीरमरण आले आहे. तर इतर दोन जवान गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

एनएनआयने मणिपूर पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी रात्री २ वाजताच्या सुमारास कुकी बंडखोरांनी केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या ताफ्यावर बॉम्बने हल्ला केला. या हल्ल्यात दोन जवानांचा मृत्यू झाला असून उपनिरीक्षक एन. सरकार आणि मुख्य शिपाई अरुप सैनी अशी मृतांची नावे आहेत. हे दोन्ही जवान मणिपूरमधील विष्णूपूर जिल्ह्यातील नारानसेना परिसरात तैनात होते.

violence erupts in manipur after recovery of bodies
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; तीन मृतदेह सापडल्यानंतर नागरिक संतप्त; राजकीय नेत्यांच्या घरांवर हल्ले
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
husband of former BJP corporator, kidnapping,
पिंपरी : अपहरण, मारहाण प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविकेचा पती, माजी स्वीकृत सदस्यासह ११ जणांवर गुन्हा
nagpur,tiger,railway,
VIDEO : हे काय ! रेल्वेच्या धडकेत १३ वाघ मृत्युमुखी
Accused who escaped after killing friend arrested
मित्राचा खून करून पसार झालेला आरोपी गजाआड, ससून रुग्णालय परिसरात कारवाई
terrorist 44 killed during the year in jammu region
जम्मू विभागात दहशतवादी कारवायांत वाढ; वर्षभरात ४४ ठार
Manipur Violence :
Manipur Violence : मणिपूरमध्ये सीआरपीएफ जवानांची मोठी कारवाई; ११ दहशतवादी ठार, दोन जवान गंभीर जखमी
bund garden road, attack on youth, Pune,
पुणे : बंडगार्डन रस्त्यावर तरुणाचा खुनाचा प्रयत्न, दोघांविरुद्ध गुन्हा

हेही वाचा – “तुम्ही भारतीय नसाल तर अमेरिकेत सीईओ होऊ शकत नाही”; राजदूत गार्सेट्टी नेमकं काय म्हणा…

मणिपूर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले, की या बंडखोरांनी सीआरपीएफ चेकपोस्टच्या समोरील पहाडावरून रात्री १२.३० वाजता अंदाधुंद गोळीबार सुरु केला होता. जो मध्ये रात्री २.१५ पर्यंत सुरू होता. यावेळी बंडखोरांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हातगोळेही फेकले. या हल्ल्यात दोन जवानांचा मृत्यू झाला, तर दोन जवान जखमी झाले.

महत्त्वाचे म्हणजे या बंडखोरांनी काही दिवसांपूर्वीच कांगपोकपी, उखरूल आणि इंफाळ जिल्ह्यात गोळीबार केला होता. या गोळीबारात कुकी समुदायातील २ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर थौबल जिल्ह्यातील हेईरोक आणि तेंगनौपालमध्येही दोन दिवस गोळीबाराच्या घटना घडल्या. याशिवाय इंफाळ पूर्व जिल्ह्यातील मोइरंगपूरेलमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला होता.