पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान सुरक्षेत मोठी त्रुटी राहिल्यानंतर शुक्रवारी सुरक्षा यंत्रणांचा एक अहवाल समोर आला आहे. या अहवालात म्हटले आहे की, पीएम मोदींच्या पंजाबमधील फिरोजपूर भेटीपूर्वी सुरक्षा यंत्रणांनी पंजाब पोलिसांना अलर्ट दिला होता की, पंतप्रधानांना अनेक दहशतवादी संघटनांकडून गंभीर धोका आहे. यासोबतच, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यादरम्यान राज्यातील शेतकरी संघटनांकडून आंदोलने होण्याची शक्यताही या अहवालात नाकारण्यात आली नव्हती.

अशातच समोर आलेल्या या अहवालात म्हटले गेले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इंडियन मुजाहिदीन, एक्स-स्टुडंट इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया, काश्मिरी आणि पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, हरकत-उल-मुजाहिदीन, हरकत-उल-मुजाहिदीन हरकत उल-जिहाद-ए. इस्लामी, तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान आणि हिजबुल मुजाहिदीन व्यतिरिक्त पाकिस्तानस्थित शीख दहशतवाद्यांपासून धोक्याची शक्यता वर्तवली होती.

सुरक्षा अधिकार्‍यांनी सप्टेंबरमध्ये फिरोजपूर आणि लगतच्या जिल्ह्य़ांमध्ये इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस (आयईडी) स्फोटके आणि फिरोजपूरमधील एका गावात टिफिन बॉम्ब जप्त केल्याच्या घटनांचा उल्लेख केला होता. यासोबतच या भागात पाकिस्तानातून स्फोटकांची तस्करी होत असल्याचेही या अधिकाऱ्यांनी म्हटले होते. अहवालात पुढे म्हटले आहे की, पंतप्रधानांना डाव्या विचारसरणीच्या दहशतवादी आणि लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम (एलटीटीई) कॅडर आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून धोका आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बुधवारी ‘सुरक्षेतील गंभीर त्रुटी’मुळे पंजाबचा दौरा अर्धवट सोडून दिल्लीला परतावे लागले. पंतप्रधानांच्या सुरक्षेत पंजाब पोलिसांकडून हलगर्जीपणा झाल्याचे नमूद करत केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंदर्भातील अहवाल मागवला़ या घटनेवरून राजकीय वादंग निर्माण झाला असून, भाजपा आणि काँग्रेसने परस्परांवर टीकेचा भडिमार सुरू केला आहे. 

मोठी बातमी! आंदोलकांनी रस्ता अडवल्याने मोदींचा ताफा अडकून पडला; रद्द करावी लागली सभा

फिरोजपूर येथील सभेसाठी निघालेला पंतप्रधानांचा ताफा शेतकरी आंदोलकांनी अडवला़ त्यामुळे मोदी हे भटिंडामधील पुलावर १५-२० मिनिटे अडकून पडले होते. अचानक झालेल्या घडामोडींनंतर मोदींचे पंजाबमधील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. पंजाब दौऱ्यात मोदींच्या हस्ते ४२ हजार ७५० कोटींच्या विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात येणार होता.

Story img Loader