नाइल डेल्टा शहरात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात इजिप्तच्या लष्करातील ब्रिगेडिअर जनरल आणि कर्नल दर्जाच्या दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. या परिसरात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने तिथे छापे टाकले. मात्र दहशतवाद्यांनी अचानक केलेल्या हल्ल्यात या अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला.
नाइल डेल्टा शहरातील या परिसरात मोठय़ा प्रमाणात स्फोटके असल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी या परिसरात छापे टाकले असता दहशतवाद्यांनी प्रतिहल्ला केला आणि त्यात हे अधिकारी ठार झाल्याचे इजिप्तच्या गृह विभागाने सांगितले.सिनाई पेनिसुला भागांत दहशतवाद्यांचे वर्चस्व आहे.

Story img Loader