राजस्थानमधील दोन शेतकऱ्यांनी उदयपूर येथील टेलरची हत्या करणाऱ्या दोन आरोपींचा कशाप्रकारे पाठलाग केला, याची माहिती पुढे आली आहे. या दोन शेतकऱ्यांनी ३५ किमी प्रवास पाठलाग करत उदयपूर घटनेतील आरोपींना पकडण्यास मदत केली. प्रल्हाद सिंग आणि शक्ती सिंग, अशी या दोन शेतकऱ्यांची नावे आहे.
प्रल्हाद सिंग आणि शक्ती सिंग या दोन्ही शेतकऱ्यांनी आपल्या जीवाची परवा न करता, उदयपूर घटनेतील आरोपींचा ३५ किमीपर्यंत पाठलाग करत आरोपींना पकडण्यास मदत केली आहे.
उदयपूर हत्या प्रकरणातील आरोपींच्या शोधात असल्याची माहिती पोलिसांकडून त्यांना मिळाली होती. शहराबाहेरून जाणारा रस्ता त्याच्या गावातून जात असल्याने आरोपी येथे आल्यास माहिती द्यावी असेल पोलिसांनी सांगितले होते. त्यामुळे आम्ही सावध होतो. आम्ही सतत आरोपीवर लक्ष ठेवून होतो, अशी माहिती प्रल्हाद सिंग यांनी दिली.
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘मी आणि माझा मित्र शक्ती सिंग हे महामार्गावर चहा घेत असताना त्यांना दुचाकीवरून रस्त्यावरून वेगाने येणारे दोन्ही मारेकरी दिसले. त्यानंतर आम्ही दोघांनी त्यांचा ३५ किमी पर्यंत पाठलाग केला. त्यांच्याकडे मोठा चाकू होता. तसेच आम्ही प्रत्येक अपडेट पोलिसांना देत होतो, अशी माहिती प्रल्हाद सिंग यांनी दिली.