कोळसा वाटप घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने बुधवारी दोन गुन्हे दाखल केले. १९९३ ते २००४ या काळात झालेल्या कोळसा खाण वाटपातील गैरप्रकारांची चौकशी सध्या सीबीआयकडून सुरू आहे.
सीबीआयकडून बुधवारी बीएलए इंडस्ट्रिज, कॅस्ट्रॉन टेक्नॉलॉजिज, कॅस्ट्रॉन मायनिंग बीएलए कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक, काही अज्ञात सरकारी नोकर आणि खासगी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. अपात्र कंपन्यांना कोळसा खाणींचे वाटप करण्यात आल्याचा ठपका या गुन्ह्यांमध्येही ठेवण्यात आला आहे.
या गुन्ह्यांप्रकरणी धनबाद, नरसिंगपूर, मुंबई आणि कोलकातामध्ये छापे टाकण्यात आले असल्याचे सीबीआयच्या प्रवक्त्याने सांगितले.

Story img Loader