मक्का येथील काबा या पवित्र स्थळाची तटबंदी असलेल्या आणि जगातील सर्वात मोठी मशीद म्हणून ख्याती पावलेल्या अल्र-हरम मशिदीत शुक्रवारी क्रेन कोसळून १०७ जणांचा मृत्यू झाला असून २३८ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन भारतीयांचा समावेश असून अन्य १५ भारतीय नागरिक जखमी झाल्याची माहिती जेधा येथील भारतीय दुतावासाकडून देण्यात आली आहे. काही आठवड्यानंतर आलेल्या हज यात्रेसाठी हजारो भाविक जमू लागले असतानाच हा अपघात झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, सध्या दुर्घटनेत जखमी झालेल्यांवर येथील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्थानिक वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, जोरदार आलेल्या वादळामुळे येथील क्रेन कोसळून हा अपघात झाला. अपघातानंतर तात्काळ मदत पथके घटनास्थळी रवाना झाली.

Story img Loader