पीटीआय, जम्मू : एका कॅप्टनसह दोन जवान मंगळवारी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शहीद झाले. अखनूर विभागात दहशतवाद्यांनी दूरनियंत्रकाच्या सहाय्याने स्फोट घडवून आणला. घटनास्थळी शोधमोहीम सुरू असल्याचे लष्कराने स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जवान गस्त घालत असताना भट्टल परिसरात दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी ही घटना घडली. जखमी जवानांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना दोघांचा मृत्यू झाला, अन्य एकावर उपचार सुरू आहेत.

नक्षल चकमकीत जवान हुतात्मा

गडचिरोली : भामरागड-छत्तीसगड सीमेवर नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत गडचिरोली पोलिसांच्या सी-६० दलातील एक जवान शहीद झाला. मंगळवारी दिरंगी-फुलणार जंगल परिसरात ही चकमक उडाली. महेश नागुलवार (३९, रा. अनखोडा), असे या जवानाचे नाव आहे. भामरागड तालुक्यातील दिरंगी आणि फुलणार या गावातील जंगलात गेल्या काही दिवसांपासून नक्षलवाद्यांनी तळ ठोकल्याची माहिती प्राप्त होताच सी-६० चे १८ पथक आणि सीआरपीएफच्या जवानांनी या परिसरात मोहीम राबवली. मंगळवारी पुन्हा या परिसराला जवानांनी घेराव घातला असता नक्षलवाद्यांनी गोळीबार केला.