रेल्वेतील सुरक्षारक्षकांची शस्त्रास्त्रे पळवण्यासाठी बिहारमध्ये नक्षलवाद्यांनी पाटणा-धनबाद इंटरसिटी एक्स्प्रेसवर गुरुवारी दुपारी हल्ला केला. या हल्ल्यात दोन जण मृत्युमुखी पडले असून, पाच जण जखमी झालेत. रेल्वे पोलिस दलाचे जवान या एक्स्प्रेसमधून प्रवास करीत होते.
इंटरसिटी एक्स्प्रेस जमुई स्थानकाजवळ येत असतानाच त्यावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. नक्षलवाद्यांनी रेल्वेतील काही शस्त्रास्त्रे पळवून नेली. सुमारे १०० नक्षलवाद्यांनी जमुई स्थानकाजवळ हल्ला केला. नक्षलवाद्यांमध्ये काही महिलादेखील होत्या. या घटनेनंतर घटनास्थळी सुरक्षा दलाची तुकडी पाठविण्यात आलीये, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री आरपीएन सिंग यांनी दिली. इंटरसिटी एक्स्प्रेस आता पाटण्याच्या दिशेने रवाना झालीये.
गेल्या महिन्यात छत्तीसगढमधील बक्सर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी कॉंग्रेसच्या परिवर्तन रॅलीवर हल्ला केला होता. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पटेल, महेंद्र कर्मा, विद्याचरण शुक्ल हे नेते नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडले होते. त्यानंतर पुन्हा एकदा नक्षलवाद्यांनी पोलिसांना आपले लक्ष्य केले.

Story img Loader