काश्मीरमधील कुलगाममध्ये रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या दहशतवादी व जवानांमधील चकमकीत दोन दहशतवादी व एक नागरिक ठार झाले, तर दोन जवान जखमी झाले. नागरिकाचा मृत्यू झाल्याने चकमक संपल्यानंतर जमावाकडून जवानांवर दगडफेक करण्यात आली.
दोन्ही दहशतवाद्यांची ओळख पटली असून जावेद अहमद कचरू व इद्रिस नेंगारू अशी त्यांची नावे आहेत. हे दोघेही दहशतवादी हिजबूल मुजाहिद्दीनचे सदस्य असल्याचे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
या चकमकीदरम्यान एका नागरिकाचा चुकून गोळी लागून मृत्यू झाला. मात्र तेथील रहिवाशांनी जवानांवर त्याच्यावर थंड डोक्याने गोळी झाडल्याचा आरोप करत दगडफेक करण्यास सुरुवात केल्याचे पोलिसांनी सांगितले.
काश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार
काश्मीरमधील कुलगाममध्ये रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या दहशतवादी व जवानांमधील चकमकीत दोन दहशतवादी व एक नागरिक ठार झाले,
First published on: 23-06-2015 at 12:32 IST
TOPICSअतिरेकी
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two let militants civilian killed in kulgam encounter