कुपवाडा जिल्ह्यातील हांडवाडा भागामध्ये लष्करे तैय्यबाच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला सोमवारी यश आले. यावेळी झालेल्या चकमकीत लष्कराचा एक अधिकारी जखमी झाला.
हांडवाडामधील मलिकपोरा गावामध्ये दहशतवादी लपल्याची माहिती पोलीसांना मिळाल्यानंतर लष्कराच्या साह्याने या भागात शोध मोहीम सुरू करण्यात आली. लष्कराच्या जवानांना बघितल्यावर दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार करण्यास सुरुवात केली. यानंतर जवानांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. दहशतवादी आणि जवानांमध्ये बराच वेळ चकमक सुरू होती.
जवानांच्या गोळीबारात दोन परदेशी दहशतवादी मृत्युमुखी पडले. यावेळी गोळीबारामध्ये मेजर संदीप कोतवाल जखमी झाले आहेत. दहशतवादी लपून बसलेल्या ठिकाणाहून शस्त्रसाठा आणि दारूगोळाही जप्त करण्यात आला.

Story img Loader