धार्मिक स्थळांची विटंबना करून दंगे घडवण्याचा कट रचणाऱ्या दोघांना उत्तर प्रदेशातील बिजनौर पोलिसांनी अटक केली आहे. दोघांनी शेरकोट पोलीस ठाणे हद्दतील काही मजारवरील चादरी जाळल्याचेही पुढे आले आहे. मोहम्मद कमाल (३५) आणि मोहम्मद आदिल (२३) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत, पोलिसांनी दोघांवरही गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद कमाल आणि मोहम्मद आदिल हे दोघेही भाऊ आहेत. यापैकी मोहम्मद कमाल हा काही दिवसांपूर्वीच परदेशातून भारतात परत आला होता. तर त्याचा भाऊ आदिल हा प्लंबर म्हणून काम करतो. या दोघांचाही कावड यात्रेदरम्यान दंगे घडवण्याचा उद्देश होता.

sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
bombay hc reject builder bail over illegal housing projects
बेकायदा गृहप्रकल्प राबवणाऱ्यांवर कारवाई गरजेची; विकासकांना जामीन नाकारताना उच्च न्यायालयाची टिप्पणी
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
Attempted murder of laborer due to argument over drinking
दारू पिताना झालेल्या वादातून मजुराचा खुनाचा प्रयत्न, भिडे पूल परिसरातील घटना
80 lakh cash worth rs 17 lakh mephedrone seized in pimpri chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये ८० लाखांची रोकड, १७ लाखांचे मेफेड्रोन जप्त
police inspector corruption
प्रकरण मिटवण्यासाठी मागितली साडेचार लाखांची लाच, नया नगरच्या लाचखोर पोलिसाला अटक

हेही वाचा – “…त्यामुळे धनुष्यबाण आमचाच आहे” बंडखोर आमदार गुलाबराव पाटलांचं मोठं विधान

दरम्यान, रविवारी ( २४ जुलै ) दुपारी ४ वाजेच्या दरम्यान दोघांनी शेरकोट पोलीस ठाणे हद्दतील एका मजारीच्या इमारतीचे नुकसान केले, अशी माहिती मजारच्या केअरटेकरने पोलिसांना दिली होती. तसेच हे दोघे भगवे दुपट्टे बांधून होते असेही त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांना तत्काळ घटनास्थळी दाखल होत आढावा घेतला. तेंव्हा दोघांनी तेथून जवळचं असलेल्या मंदिरांचेही नुकसान केले, अशी माहिती पोलिसांना मिळाली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपींना शोधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिथूनच काही अंतरावर दोघेही लपले असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. अखेर पोलिसांनी पाठलाग करत दोघांनाही अटक केली.

पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून हा सर्व प्रकार करण्यामागे त्यांचा काय उद्देश होता, याची चौकशी पोलीस करत आहेत. तसेच यामागे कोणत्या संघटनेचा हात आहे का, याचा तपासदेखील सुरू असल्याचे पोलिासांनी सांगितले.