येथे मध्यरात्रीनंतर झालेल्या चकमकीत उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्हय़ात झालेल्या चकमकीत दोन परदेशी अतिरेकी ठार झाले, तर लष्कराच्या एका अधिकाऱ्यासह तीन सुरक्षा जवान मृत्युमुखी पडले.
येथून १२० कि.मी. अंतरावर क्रालपोरा येथे लष्कराचे व पोलिसांचे गस्ती वाहन अतिरेक्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत असताना ही चकमक सुरू झाली ती फार उशिरापर्यंत सुरू होती असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
एका घरात अतिरेकी लपून बसले असताना ते जिथे लपले होते ती इमारतच उद्ध्वस्त करण्याचे काम अखेर आज दुपारी पूर्णत्वास गेले. दोन अतिरेक्यांचे व दोन पोलिसांचे मृतदेह ढिगाऱ्याखाली सापडले. या कारवाईत लष्कराचा ज्युनिअर कमिशन्ड अधिकारी मृत्युमुखी पडला, तर इतर चार पोलीस जखमी झाले. जखमी पोलिसांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यात एका सहायक उपनिरीक्षकाचा समावेश आहे. त्याची प्रकृती गंभीर आहे.
अधिकाऱ्याने सांगितले, की ठार झालेले अतिरेकी कुठल्या संघटनेचे आहेत हे समजू शकले नाही, पण ते परदेशी आहेत हे निश्चित झाले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा