लोकसभेत काही वेळापूर्वीच दोन तरुण घुसले होते. त्यामुळे एकच गदारोळ झाला. या दोघांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. संसद भवनावर झालेल्या हल्ल्याला आजच २० वर्षे पूर्ण झाली. आजच्याच दिवशी लोकसभेत दोन तरुण शिरले होते. त्यांनी खासदारांच्या बाकांवरुन उड्या मारल्या आणि पिवळ्या रंगाचा धुराचे नळकांडे घेऊन ते आले होते. या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याविषयी माहिती दिली आहे.

काय म्हटलं आहे पोलिसांनी?

आम्ही दोघांना ताब्यात घेतलं आहे. त्यांनी पिवळ्या रंगाच्या धुराचे कॅन आणले होते. त्या कॅनमध्ये पिवळ्या रंगाचा फ्लोरोसंट धूर होता असंही पोलिसांनी सांगितलं आहे. दोन युवक बाहेरही होते तानाशाही नहीं चलेगी हा नारा ते देत होते. असंही पोलिसांनी सांगितलं आहे. या दोघांना खासदारांनी तातडीने या दोघांना पकडलं त्यानंतर त्यांना सुरक्षा दलाच्या ताब्यात देण्यात आलं आहे. सुरक्षा दलाने तातडीने दोघांना ताब्यात घेतलं आता पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलं आहे. या दोघांकडून पिवळ्या रंगाचा गॅस असलेले कॅन ताब्यात घेतले आहेत.

Police arrest one for black marketing commercial gas Pune news
व्यावसायिक गॅसचा काळाबाजार उघड; पोलिसांकडून सिलिंडरच्या ७२ टाक्या जप्त, एकाला अटक
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
nia raided Chayanagar Amravati and detained suspected youth for questioning
‘एनआयए’ची अमरावतीत छापेमारी; संशयित युवक ताब्यात, पाकिस्तान कनेक्शन….
Theatre canteen owner bites man's ear over food bill during 'Pushpa 2' screening.
Pushpa 2 : चित्रपटगृहाच्या कॅन्टीन मालकाने घेतला पुष्पा २ पाहायला आलेल्या प्रेक्षकाच्या कानाचा चावा, मध्यांतरावेळी नेमकं काय घडलं?
kidnap of uncle of MLA Yogesh Tilekar, Yogesh Tilekar uncle, Yogesh Tilekar latest news,
आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण, पोलिसांकडून अपहरणकर्त्यांचा शोध
incident of looting jewels from owner of Sarafi Pedhi at gunpoint It happened on Sunday night in Sarafi peth on B T Kavade street
बी. टी. कवडे रस्ता भागात सराफी पेढीवर सशस्त्र दरोडा, पिस्तुलाच्या धाकाने दागिन्यांची लूट
Loksatta anvyarth issue of the withdrawal of government honors granted to two non-resident Indians in Britain
अन्वयार्थ: बहुमान आणि मानापमान
man murder over property dispute, Mumbai ,
मुंबई : मालमत्तेच्या वादातून ३६ वर्षीय व्यक्तीची हत्या, दोघांना अटक

नेमकं काय घडलं?

सगळा गदारोळ पाहून सगळे खासदार सभागृहाबाहेर पडले. ठाकरे गटातील खासदार अरविंद सावंतही बाहेर आले आणि त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी सावंत यांनी सभागृहात घडलेल्या घटनेची माहिती दिली. सावंत म्हणाले, लोकसभेचं कामकाज सुरू असताना अचानक दोनजण प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात आले. एका खांबाच्या मदतीने ते खाली प्रेक्षक गॅलरीतून आले. दोघांनी लागोपाठ उड्या मारल्या. मग दोघेही खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत धावत होते. तेवढ्यात त्यातल्या एकाने बूट काढले, तो बूट काढत होता तेव्हा काही खासदारांनी त्याला घेरलं. त्याचप्रमाणे दुसऱ्या इसमालाही पकडलं. त्याचवेळी सभागृहात गॅस पसरू लागला. पिवळ्या रंगाचा गॅस दिसत होता. तो गॅस कसा आला ते माहिती नाही. पण या गॅसमुळे नाकाला आणि डोळ्यांना त्रास होत होता. सुरक्षारक्षकांनी या दोन्ही इसमांना ताब्यात घेतलं आहे.

Story img Loader