ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीनचे (एआयएमआयएम) अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार झाला आहे. आज मेरठच्या किथौध भागातून दिल्लीला जात असताना दोन लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांच्या ताफ्यावर गोळ्या झाडल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एएनआयशी बोलताना ओवेसी म्हणाले, “मी किथौध, मेरठ येथील एका मतदान कार्यक्रमानंतर दिल्लीला निघालो होतो. छाजरसी टोल प्लाझाजवळ दोन लोकांनी माझ्या वाहनावर सुमारे तीन ते चार गोळ्या झाडल्या. ते एकूण ३-४ लोक होते. माझ्या वाहनाचे टायर पंक्चर झाले, त्यानंतर मी तेथून दुसऱ्या वाहनाने निघालो,” असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, या प्रकरणात वापरलेली शस्त्र सापडली असून एका आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

“या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करावी. या घटनेमागे कुणाचा हात होता, याचा तपास करावा. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मोदी सरकारने याची चौकशी करावी. एका खासदारावर उघडपणे गोळीबार होणं, कसं शक्य आहे,” असा सवाल ओवेसी यांनी केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two people fire bullets at aimim chief owaisis convoy in meerut hrc
Show comments