उत्तर काश्मीरमधील कूपवाडा जिल्ह्य़ात अतिरेक्यांनी दोन पोलिसांची गोळ्या घालून हत्या केली. भारतीय राखीव पोलीस दलातील हवालदार संतोष कुमार आणि आझाद चंद अशी हत्या करण्यात आलेल्या दोघा पोलिसांची नावे आहेत. उत्तर काश्मीरमध्ये हे दोघे अधिकारी नेहमीप्रमाणे गस्तीवर होते. त्यावेळी अतिरेक्यांनी अत्यंत जवळून केलेल्या गोळीबारात दोघेही जण गंभीर जखमी झाले. त्यांना जवळच असलेल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, काश्मीरमधील हंदवारा विभागातील रहदारी सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आली आहे.

Story img Loader