कुबन पार्क येथे एका ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार करणाऱ्या दोन खासगी सुरक्षा रक्षकांना पोलिसांनी अटक केली. गस्तीवरील पोलिसांना बुधवारी रात्री दहाच्या सुमारास उद्यानात एक महिला आढळली. उद्यानातील दोन सुरक्षा रक्षकांनी तिच्यावर बलात्कार केला. बंगळुरूपासून ६० कि.मी. अंतरावर असलेल्या तुमकुर येथील ही महिला बुधवारी पार्कमधील टेनिस क्लबवर आली होती. ती गुरुवारी परत जाणार होती. त्यामुळे तिने क्लबच्या वाहनतळ परिसरात थांबण्याचे ठरविले. रात्री साडेनऊच्या सुमारास दोन खासगी सुरक्षा रक्षक तेथे आले आणि या महिलेस पार्कमधून बाहेर जाण्यास सांगितले. त्यांनी बाहेर पडण्याचा मार्ग दाखवण्यात बहाणा करून तिच्यावर अत्याचार केला. हे सुरक्षा रक्षक आसामाचे असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

Story img Loader