जम्मू-काश्मीरमध्ये मंगळवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराच्या जवानांना यश आले. कुपवाडा जिल्ह्यातील सीमेलगत असलेल्या झूनारेशी गावामध्ये आणि दक्षिण काश्मीरमधील शोपिअन भागात या चकमक झाल्या.
या ठिकाणी दहशतवादी लपून बसल्याची माहिती लष्कराला मिळाल्यानंतर त्या ठिकाणी तातडीने जवान पाठवून शोधमोहिम राबविण्यात आली. पाकव्याप्त काश्मीरमधून काही दहशतवाद्यांनी गेल्या आठवड्यात सीमा ओलांडून भारतात प्रवेश केल्याची माहिती मिळाली होती. तेच दहशतवादी आज झालेल्या चकमकीत ठार झाल्याची माहिती मिळते आहे. या दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.
शोपिअन भागामध्ये सोमवारी रात्रीपासून लष्कराचे जवान आणि दहशतवादी यांच्या चकमक सुरू होती. त्यामध्ये एक दहशतवादी ठार झाला. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात दारूगोळा आणि शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली असल्याची माहिती लष्कराने दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा