जम्मू काश्मीरमध्ये सुरु असलेल्या टार्गेटेड किलिंग्जमुळे येथे सध्या तणावाचे वातवरण आहे. असे असताना आता श्रीनगरमधील बेमिना भागात दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार येत्या ३० जूनपासून सुरु होणाऱ्या अमरनाथ यात्रेवर हल्ला करण्याचा या दहशतवाद्यांचा कट होता. मात्र श्रीनगरमधील बेमिना भागात पोलिसांनी त्यांना ठार ठार केले. हे दहशतवादी लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते.
हेही वाचा >>> नॅशनल हेराल्ड आर्थिक गैरव्यवहार प्रकरण : राहुल गांधी यांची आज ईडीकडून पुन्हा चौकशी
मिळालेल्या माहितीनुसार, ३० जूनपासून सुरु होणाऱ्या अमरनाथ यात्रेवर हल्ला करण्याच्या उद्देशाने पाकिस्तानमधून दोन दहशतवादी आले होते. त्यांच्यासोबत श्रीनगर भागातील एक स्थानिक रहिवासी असलेला दहशतवादीदेखील होता. या स्थानिक दहशतवाद्याची ओळख पटली असून त्याचे नाव आदिल हुसैन मीर असून तो अनंतनाग येथील पहलगाम येथील तो रहिवासी होता. तर पाकिस्तानमधून आलेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एकाचे नाव अब्दुल्ला गौजरी असे आहे. पोलिसांनी या तिन्ही दहशतवाद्यांना आता ठार केले असून या कारवाईत एक पोलीस किरकोळ जखमी झाला आहे. सोमवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.
हेही वाचा >>> पोलिसांकडून पी चिदंबरम यांना धक्काबुक्की, हाड मोडलं; म्हणाले “जेव्हा तीन पोलीस कर्मचारी तुमच्या…”
काश्मीर झोनचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी या कारवाईबाबात अधिक माहिती दिली आहे. “चकमकीच्या ठिकाणी दहशतवाद्यांशी संबंधित काही सामान तसेच कागदपत्रे जप्त करण्यात आले आहे. या कागदपत्रांनुसार ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी एकाचे नाव अब्दुल्ला गौजरी असून पाकिस्तानातील फैसलाबाद येथील रहिवासी आहे. सोपोर येथे झालेल्या चकमकीतून हेच दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले होते. आम्ही त्यांचा मागोवा घेत होत होतो. तर स्थानिक रहिवासी असलेला आदिल हुसैन मीर उर्फ सुफियान हा अनंतनाग जिल्ह्याली रहिवासी आहे. तो २०१८ साली वाघा सीमेवरुन पाकिस्तामध्ये गेला होता,” असे कुमार यांनी सांगितले आहे.