अमेरिकन काँग्रेसचे दोन सदस्य अमेरिकन आणि अफगाण लोकांना परत आणण्यासाठी चाललेल्या प्रयत्नांना पाहण्यासाठी मंगळवारी गुप्तपणे काबुलला गेले असल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर बायडेन प्रशासनाने या सदस्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर सभागृहाच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांनी इतर सदस्यांना त्यांच्या कृतीचं अनुसरण करू नये असं आवाहन केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“आमच्या दौऱ्याचा उद्देश तिथल्या कामावर देखरेख करणं हा होता,” असं सेठ मौल्टन आणि पीटर मेजर या दोघांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे. यानंतर दोन्ही सदस्यांना बिडेन प्रशासनाला फटकारलं होतं. या दोन्ही सदस्यांनी अमेरिकन नागरिक आणि अफगाण सहयोगींना बाहेर काढण्याबाबत बायडेन प्रशासनाला फटकारल्याची माहिती मिळते. “ही सध्या जगात अशी जागा आहे जिथे देखरेख सर्वाधिक महत्त्वाची आहे.” असे ते म्हणाले. मात्र, प्रशासनाचे अधिकारी मौल्टन आणि मेजर हे अनधिकृतपणे अफगाणिस्तानात दाखल झाल्याबद्द संतप्त झाले आहेत. असोसिएटेड प्रेसने याबाबतची माहिती दिली आहे.

‘ते’ काबूलमध्ये २४ तासांपेक्षा कमी काळ

मौल्टन आणि मेजर यांनी सांगितलं की, “रिकाम्या सीट असलेल्या विमानात आम्ही फक्त क्रू-सीट्समध्ये बसलो होतो. जेणेकरून, सीटची गरज असणाऱ्या कोणाचीही आमच्यामुळे गैरसोय होणार नाही याची आम्ही काळजी घेतली होती.” दरम्यान, ते २४ तासांपेक्षा देखील कमी काळ काबूलमध्ये होते. तरीही, पेलोसी यांनी मंगळवारी रात्री इतर सदस्यांना त्यांचं अनुकरण न करण्याचा इशारा दिला.

पेलोसीने एका पत्रात लिहिलं आहे की, “अफगाणिस्तान आणि आसपासच्या देशांतील कोणाचाही असा प्रवास अफगाणिस्तानातून धोका असलेल्या अमेरिकन आणि अफगाणिस्तानातील नागरिकांना सुरक्षित आणि त्वरीत बाहेर काढण्यासाठी सुरु असलेल्या कामामध्ये वापरल्या जाणाऱ्या अत्यावश्यक संसाधनांना अनावश्यकपणे दुसरीकडे वळवला जाऊ शकतो,” मात्र, यामध्ये पेलोसी यांनी मौल्टन आणि मेजरच्या नावांचा उल्लेख केला नाही.

आपल्याला लाज वाटली पाहिजे!

मंगळवारी रात्री दिलेल्या आपल्या निवेदनात अमेरिकन काँग्रेसच्या दोनी सदस्यांनी प्रशासनाच्या अफगाणिस्तानमधील स्थलांतराच्या परिस्थितीच्या हाताळणीवर भाष्य करत तीव्र टीका केली आहे. “आपण आपल्या सेवा सदस्यांना ज्या स्थितीत ठेवले त्याबद्दल वॉशिंग्टनला लाज वाटली पाहिजे. तेथील कमांडर्सशी बोलल्यानंतर आणि इथली परिस्थिती पाहिल्यानंतर हे उघड आहे की, आम्ही खूप उशिरा हे स्थलांतर सुरू केलं. त्यामुळे आपण काहीही केलं तरी सर्वांना वेळेत बाहेर काढू शकणार नाही,” असं या दोघांनी म्हटलं आहे.

(न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख केटी एडमंडसन यांनी लिहिला आहे.)