एक्स्प्रेस वृत्त, थिरुवनंतपूरम : केरळच्या पथनमथिट्टा जिल्ह्यात धनलाभाच्या हेतूने एका दाम्पत्याकडून दोन महिलांचा बळी देण्यात आल्याचा आरोप आहे. हत्या झालेल्या या दोन्ही महिला एर्नाकूलम जिल्ह्यातील आहेत. याप्रकरणी आरोपी तांत्रिकास अटक करण्यात आली असून एलनथूर येथील भागवपाल सिंह आणि लैला या पती-पत्नीस ताब्यात घेण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले. एलनथूर गावात घडलेल्या या घटनेत दोन महिलांचे अपहरण करून त्यांचे शीर धडावेगळे करण्यात आले. नंतर त्यांना जमिनीत पुरण्यात आले, असे पोलिसांनी मंगळवारी सांगितले. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या प्रकरणात पेरुमबाव्हूर येथून शफी ऊर्फ राशीद यास अटक करण्यात आली आहे. आपण तांत्रिक असल्याचे त्याने या आरोपी दाम्पत्यास भासविले होते. ताब्यात घेण्यात आलेला भागवपाल सिंह हा पारंपरिक वैद्य असल्याचा दावा करतो. त्याच्याकडे उपचारासाठी अनेकजण येतात. या प्रकरणात तो पहिला आरोपी आहे. त्याला आणि त्याच्या पत्नीला रीतसर अटक होईल, असे कोची शहर पोलीस आयुक्त सी. एच. नागराजू यांनी सांगितले. शफी याला पैशाचे प्रलोभन दाखविण्यात आल्याने त्याने या दोन महिलांना भागवपाल याच्याकडे उपचाराच्याबहाण्याने नेले होते. अत्यंत क्रूरपणे या महिलांची हत्या करण्यात आली, असे नागराजू म्हणाले. हा नरबळीचा प्रकार असावा, असा पोलिसांना संशय आहे.   

प्रकरणाची पार्श्वभूमी : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एर्नाकूलम जिल्ह्यातील रोस्लीन ही लॉटरी विक्रेती जूनमध्ये, तर पद्मा ही लॉटरी विक्रेती सप्टेंबरमध्ये बेपत्ता झाली. पद्माचा शोध घेतला जात असताना पोलिसांना तो नरबळीचा प्रकार असल्याची शक्यता वाटली. आर्थिक हलाखीत असलेल्या आरोपी दाम्पत्याने धनलाभासाठी हे केल्याचा आरोप आहे. तशी कबुली त्यांनी तसेच त्यांच्या हस्तकाने दिल्याचा दावा पोलिसांनी केला. मूळची तमिळनाडूची असलेल्या पद्माच्या मोबाइलचा कॉल रेकॉर्ड तपासला असता धागेदोरे शफीपर्यंत पोहोचले. त्याच्या चौकशीत हे प्रकरण उघड झाले.