हनोई : यागी चक्रीवादळ शनिवारी दुपारी धडकण्याची शक्यता असल्यामुळे व्हिएतनामच्या उत्तरेकडील प्रांतांनी विमानतळे बंद केली असून लोकांना परिसर रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत. या चक्रीवादळामुळे चिनी प्रांत हेनानमध्ये दोन जण ठार आणि सुमारे शंभर जखमी झाले आहेत. यागी गेल्या दशकातील सर्वात शक्तिशाली वादळांपैकी एक असल्याचे वर्णन हवामानशास्त्रीय अधिकाऱ्यांनी केले आहे.
हेही वाचा >>> ६२ हजार खटले ३० वर्षांपासून प्रलंबित; सर्व प्रकरणे उच्च न्यायालयांमधी
ताशी १५० ते १६६ किलोमीटर इतका त्याचा वेग आहे. याचा अर्थ ते १४ च्या पातळीवर असून एक प्रभावी चक्रीवादळ असल्याचे राज्य माध्यमांनी म्हटले आहे. हे चक्रीवादळ युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ घोषित केलेल्या क्वांग निन्ह या किनारपट्टीच्या प्रांताजवळील ‘हा लॉन्ग बे’ येथे धडकण्याची शक्यता आहे. हा भाग चुनखडीच्या बेटांसाठी ओळखला जातो. त्यामुळे या वादळामुळे येथील शेकडो क्रूज आधीच रद्द केल्याचे राज्य माध्यमांनी सांगितले. तसेच सरकारने अनेक सूचनाही जारी केल्या असून पूर किंवा भूस्खलनाचा धोका असलेल्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येत आहे. राजधानी हनोई आणि हैफॉन्ग या बंदर शहरासह चार विमानतळे बंद करण्यात आली आहेत. यागीने शुक्रवारी दुपारी चीनच्या हेनान प्रांतातील वेनचांग या चिनी शहरातील केंद्राजवळ सुमारे २४५ किमी प्रतितास वेगाने धडक दिली. स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, शनिवारी वादळामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आणि किमान ९२ जण जखमी झाले. लाखो लोकांना स्थलांतरित करण्यात आले. फिलिपाइन्समधील ४७,६०० हून अधिक लोक चक्रीवादळामुळे विस्थापित झाले. अनेक देशांतर्गत विमान उड्डाणे विस्कळीत झाली.